
वर्ध्यात पोलिसांची मोठी कारवाई; १२.२९ लाखांच्या सुगंधी तंबाखूसह ‘सोनू सुपारीवाला’ अटकेत!
Facebook Like / Share
Instagram Follow
YouTube Like / Subscribe
वर्ध्यात १२.२९ लाखांचा अवैध सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त; ‘सोनू सुपारीवाला’ पोलिसांच्या जाळ्यात!
वर्धा: वर्धा शहरात अवैध आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अन्न व औषधी प्रशासन (FDA) यांनी संयुक्तपणे छापा टाकून तब्बल १२,२९,८७२ रुपये (बारा लाख एकोणतीस हजार आठशे बहात्तर रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








