भंडारा येथे अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी तात्काळ केली अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

भंडारा:

भंडारा शहरात एका अंगणवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना ६ ऑगस्ट २०२६ रोजी उघडकीस आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून भंडारा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला तात्काळ अटक केली आहे.



प्राप्त माहितीनुसार, ६ ऑगस्टच्या सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीची आई तिला घराजवळील अंगणवाडीत सोडून स्वतः शिवणक्लाससाठी गेल्या होत्या. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास मुलीचा भाऊ आईकडे गेला आणि बहीण रडत असल्याची माहिती त्याने दिली. आईने तात्काळ अंगणवाडीत धाव घेतली असता बाहेरील बाजूने बंद असलेल्या बाथरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता.

दार ठोठावल्यानंतर एका अनोळखी इसमाने आतून दार उघडले. त्यावेळी पीडित चिमुकली अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती, तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर नखांचे ओरखडे होते. मुलीला शारीरिक त्रास होत असल्याने तिच्या आईने तिला तात्काळ भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीत मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.



आरोपीची ओळख व अटक:

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष पथके तयार करून तपासाला गती देण्यात आली.



स्थानिकांनी दिलेली माहिती आणि पोलीस तपासावरून आरोपी रोहित संजय वासनिक (वय ३० वर्षे, रा. गौतमबुद्ध वॉर्ड, समतानगर, भंडारा) हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले असून त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.



दाखल गुन्हे आणि कायदेशीर कारवाई:

आरोपीविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४, ६४ (२) (i), ६५(२), ११५(२) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ (POCSO Act) च्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विशेष तपास पथक (SIT) गठीत:

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार उपविभाग भंडारा) ज्योतिका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ११ सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे. या पथकामध्ये पो.नि. सुरेंद्र राऊत, म.स.पो.नि. प्रियंका गोदमले, स.पो.नि. महेंद्र शहारे, म.पो.उपनि. रूचिरा पात्रे, पो.उपनि. मनोहर गाढवे या अधिकाऱ्यांसह इतर पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!