हिंगणघाटचा गांजा तस्कर ‘भुर्या’ स्थानबद्ध; वर्धा पोलिसांची ‘PITNDPS’ अंतर्गत पहिलीच मोठी कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाटचा गांजा तस्कर राकेश उर्फ ‘भुऱ्या’ स्थानबद्ध; वर्धा पोलिसांची ‘PITNDPS’ कायद्यांतर्गत पहिलीच धडक कारवाई

वर्धा: अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध वर्धा जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हिंगणघाट येथील कुख्यात गांजा तस्कर राकेश उर्फ भुऱ्या सिद्धार्थ जनबंधू (रा. टाका ग्राउंड, हिंगणघाट) याच्यावर PITNDPS (अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ बेकायदेशीर व्यापार प्रतिबंधक कायदा, १९८८) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई ठरली आहे.



कारवाईची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास

  • ७ गुन्हे दाखल: आरोपी राकेश उर्फ भुऱ्या याच्यावर हिंगणघाट पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.



  • सुधारणा न झाल्याने कठोर पाऊल: पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते. मात्र, त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा होत नव्हती.

PITNDPS अंतर्गत स्थानबद्धता जामिनावर मुक्त झाल्यास आरोपी पुन्हा अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय होण्याची आणि समाजविघातक कृत्ये करण्याची दाट शक्यता होती. हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याविरोधात PITNDPS कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला होता.



गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले. आरोपीची रवानगी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे करण्यात आली असून, स्थानबद्धतेचा कालावधी ॲडव्हायझरी बोर्डाच्या (Advisory Board) सुनावणीनंतर निश्चित होणार आहे.

पोलीस पथकाची कामगिरी ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोहवा उमाकांत लडके, रवींद्र घाटुले, संतोष वाघमारे, पोअं अनंत हराळ, भारत बुटलेकर आणि दीपक मस्के (सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, हिंगणघाट) यांच्या पथकाने केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!