
अंमली पदार्थ MD पावडर सह तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने घेतले ताब्यात,९० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीकरीता एम. डी. पावडर बाळगणाऱे ३ ईसमास ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ९११८०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२१)ॲागस्ट २०२४ रोजी गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक हे शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सकाळी १०.४५ वा. ते १.३० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार रोहीत काळे यांना गोपनीय माहिती मिळाली ती सायबर टिमचे विशेष सहकार्याने शहानीशा केली की नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीत एक ईसम अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार आहे


यावरुन पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत, लोहाना भवन जवळील, हिवरी नगर गार्डन समोरील रस्त्यावर, सार्वजनिक रोडवर एम.डी पावडरची देवान घेवान होणार आहे तिथे मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून पाळत ठेवुन, सापळा रचुन तिन ईसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नांव १) कपिल गंगाधर खोब्रागडे, वय ४० वर्षे, रा. राजेन्द्र नगर, नंदनवन झोपडपट्टी, आंबेडकर चौक, नागपुर (सुपरवायजर आरोग्य विभाग मनपा नागपूर) २) राकेश अनंतराव गिरी वय ३१ वर्ष रा. बौध्द विहार जवळ, नंदनवन, झोपडपट्टी, नागपूर ३) अश्वय बंडु वंजारी वय २५ वर्ष रा. जुना बगडगंज, बजरंग नगर, नंदनवन, नागपूर असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ ९०७ ग्रॅम एम.डी. पावडर कि ९०,७०,०००/- रू. ची मिळुन आली.

तसेच आरोपींचे ताब्यातुन एम.डी. पावडर, चार मोबाईल फोन, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा व रोख ७,०००/- रू. असा एकुण ९१,१८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींवर यापुर्वी सुध्दा एन.डी.पी.एस कायदयाअन्वये गुन्हे दाखल आहे. आरोपींची अधिक विचारपुस केली असता, त्यांनी यातील पाहीजे असलेला आरोपी १) सोहेल नावाचा ईसम रा. सारंगपूर, मध्य प्रदेश २) मकसूद अमीनुधीन मलीक रा. ताजनगर, टेका, नागपुर ३) गोलू बोरकर रा. हिवरी नगर, नंदनवन, नागपूर ४) अक्षय बोबडे रा. हिंगणा, नागपूर ५) अल्लारखा रा. हिंगणा, नागपूर याचे मदतीने अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करीत असल्याचे सांगीतले. आरोपींचे हे कृत्य कलम ८ (क), २२ (क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे नंदनवन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन. आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. पाहीजे आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)राहुल माकणीकर,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, पोहवा. मनोज नेवारे, पवन गजभिये, शैलेश ढोबोले,पोशि रोहीत काळे, राहुल पाटील, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर व सहदेव चिखले यांनी सायबर टिमचे मदतीने केली.


