सीताबर्डी पोलिसांची धडक कारवाई; १४.८० लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू व क्रेटा कार जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर:

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा आणि १३ लाख रुपयांची Hyundai Creta कार असा एकूण १४,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



कारवाईचा तपशील:

दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १३.५० ते १४.५० वाजताच्या दरम्यान सीताबर्डी पोलिसांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते. दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कार (क्रमांक MH 49 BK 3083) मधून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.



मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी रामदासपेठ येथील नंदाजी मंदिराजवळील मोकळ्या जागेत पाहणी केली असता, तेथे संशयित क्रेटा कार आढळून आली. कारजवळ कोणीही व्यक्ती हजर नव्हती. पोलिसांनी पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता, कारमध्ये ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ नावाच्या एकूण ४५ पेट्या मिळून आल्या. प्रत्येक पेटीत ९० मि.ली. च्या १०० बाटल्या, म्हणजेच एकूण ४,५०० बाटल्या (किंमत ₹१,८०,०००/-) मिळून आल्या.

आरोपीची ओळख व गुन्हा दाखल:



पोलीस तपासात सदर वाहनाचा मालक शानु कन्हैयालाल कोडापे (वय ३७ वर्षे, रा. रामदासपेठ, नंदाजी मंदिराजवळ, नागपूर) असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या वाहनात अवैध दारूचा साठा आढळल्याने त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:



ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सदर धडक कामगिरी पोलीस उपआयुक्त (परि मंडळ २) . श्रीमती अन्नपूर्णा सिंग व सहाय्यक पोलीस आयुक्त (सीताबर्डी विभाग)  सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वपोनि  सुहास राऊत, सपोनि विनोद मांधरे, पोहवा. आशिष बहाळ, नापोअं. देवेंद्र सुर्यवंशी, पोअं. राजेश घोगडे, मपोअं. अनिता वरकडे व चालक सफौ. अनिल चौधरी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!