
नागपुरात १७ लाखांच्या एम.डी. पावडरसह दोघे गजाआड; गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई
नागपूर शहर पोलिसांची कारवाई: पांढऱ्या ‘किया सोनेट’ कारमधून १७ लाखांचे एम.डी. पावडर जप्त, दोघे जेरबंद
नागपूर:

शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत १७ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आणि तिची विक्री करू पाहणाऱ्या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
छावणी परिसरात पोलीस जाळे

अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात असलेल्या सर्व्हिस रोडवर (बंगला क्र. ७/१२ च्या बंद गेटसमोर) काही जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०४:०० ते ०६:३० च्या दरम्यान या परिसरात सापळा रचला.
घटनास्थळी पांढऱ्या रंगाच्या ‘किया सोनेट’ कारजवळ दोन संशयित व्यक्ती उभ्या असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष त्यांची कसून चौकशी केली.

अटक करण्यात आलेले आरोपी
१. संदेश संजय मुन (वय ३७ वर्षे, रा. तिसगाव पाडा, कल्याण, जि. ठाणे)

२. शारीक अमानत खोकर (वय २८ वर्षे, रा. गांधी ले-आऊट, जाफर नगर, नागपूर)
मोठा मुद्देमाल जप्त
आरोपींची आणि त्यांच्या कारची झडती घेतली असता पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला:
-
एम.डी. पावडर: ५३ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम (झिपलॉक पिशवीत)
-
वाहनाची जप्ती: किया सोनेट कार (क्रमांक: MH 31 FX 6719)
-
इतर साहित्य: ३ मोबाईल फोन
(जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत ₹१७,११,२००/- इतकी आहे.)
मुंबई कनेक्शन उघड; आरोपींवर गंभीर गुन्हे
पोलीस चौकशीदरम्यान आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा अमली पदार्थांचा साठा बाळगल्याची कबुली दिली. ही एम.डी. पावडर त्यांनी त्यांचा साथीदार वारीस अन्सारी (रा. भायखळा, वेस्ट मुंबई) याच्या मदतीने नागपुरात विक्रीसाठी आणली होती.
तसेच आरोपी संदेश मुन याच्यावर यापूर्वीही नागपुरातील सक्करदरा आणि राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) ॲक्टअन्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
कायदेशीर कारवाई व पुढील तपास
आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २२(क), आणि २९ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना मुद्देमालासह सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून फरार आरोपी वारीस अन्सारी याचा शोध सुरू आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
नागरीकांनी आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद घटना किंवा बेकायदेशीर हालचाली आढळल्यास पोलिसांना अचूक माहिती द्यावी. पोलिसांची दिशाभूल केल्यास किंवा खोटी माहिती देऊन बनाव रचल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
या कारवाईत सहभागी असलेले अधिकारी आणि अंमलबजावणी पथकाचे सविस्तर नाव व तपशील खालीलप्रमाणे आहे:
मार्गदर्शक अधिकारी:
विश्वास नांगरे पाटील – पोलीस आयुक्त, नागपूर शहर
नवीनचंद्र रेड्डी – सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर
राजेंद्र दाभाडे – अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर
दीपक अगरवाल – पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन)
वैभव जाधवर – सह. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)
कारवाई करणारे पोलीस पथक (अमली पदार्थ विरोधी पथक):
पो.नि. (पोलीस निरीक्षक): भारत शिरसागर
पो.उपनि. (पोलीस उपनिरीक्षक): नागेश पुन्नावाड
पो.हवा. (पोलीस हवालदार):
अरविंद गडेकर
शैलेश दोबोले
रत्नाकर कोठे
पो.अं. (पोलीस अंमलदार):
शेषराव रेवतकर
धनपत मंझरेटे
धनराज




