सोलर प्लांटमधील केबल चोरीचे २ गुन्हे उघडकीस; ₹६.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवतमाळ:

यवतमाळ जिल्ह्यातील सोलर प्लांटमधून सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी आर्णी येथे केलेल्या या कारवाईत आर्णी व दिग्रस पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेले सोलर केबल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.



 कारवाईची पार्श्वभूमी व अटक आरोपी

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आर्णी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, भंगार व्यापारी शेख अहमद शेख सादिक (वय ३६ वर्षे, रा. शास्त्रीनगर, आर्णी) व त्याचे साथीदार केबल चोरीत सहभागी असल्याची गुप्त बातमी मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने माहेर मंगल कार्यालय (आर्णी) परिसरात छापा टाकला. तेथे एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनात (क्र. MH-02-AL-8432) संशयितरीत्या बसलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले:



  1. शेख अहमद शेख सादिक (वय ३६, रा. शास्त्रीनगर, आर्णी)

  2. शेख कादर उर्फ कलीम शेख छोटू (वय २९, रा. अमराईपुरा, आर्णी)



 चोरीची पद्धत व कबुली

वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यामध्ये पॉलीकॅब कंपनीची ०४ एम.एम. सोलर केबल (सुमारे २००० मीटर) आणि चोरीसाठी लागणारे वायर कटर, पकड असा मुद्देमाल आढळून आला.

आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी:



  • हेटी (ता. आर्णी) आणि तुपटाकळी (ता. दिग्रस) येथील सोलर प्लांटमधून सोलर केबल चोरी केल्याचे मान्य केले.

  • केबल जाळून त्यातील तांबे वेगळे केले व ठोक भंगारामध्ये टप्प्याटप्प्याने विकल्याची कबुली दिली.

  • आरोपी शेख अहमद याच्या ‘हुमेरा स्क्रॅप’ (आर्णी) या भंगार गोदामातून तुपटाकळी येथील केबल विक्रीतून मिळालेले ₹२५,००० रोख जप्त करण्यात आले.

 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण ₹६,८८,०००/-)

  1. पॉलीकॅब ४ एम.एम. सोलर केबल (२००० मीटर): ₹१,६२,०००/-

  2. वायर कटर, पकड व साहित्य: ₹१,०००/-

  3. स्कार्पिओ वाहन (MH-02-AL-8432): ₹५,००,०००/-

  4. नगद रक्कम: ₹२५,०००/-

या कारवाईमुळे खालील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत:

  • पोलीस स्टेशन आर्णी

  • पोलीस स्टेशन दिग्रस

आरोपी व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी आर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

 कामगिरी करणारे पथक

ही कामगिरी यवतमाळचे पोलीस अधीक्षक  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक  अशोक थोरात आणि एलसीबी पो.नि.  सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:

  • पोलीस उप-निरीक्षक:  शिवशंकर दिनकर कायंदे

  • पोलीस अंमलदार:  सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, सचिन मलाये, किशोर झेंडेकर, पवन ढवळे, अमित झेंडेकर, कविश पालेकर, दिगांबर पिलावन

  • चालक:  जितेंद्र चौधरी







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!