
अमरावतीत दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; ३.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
अमरावती: सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने अमरावती शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश केला आहे.
ही कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रोशन शिरसाट आणि क्राईम पो.नि. श्री. रामदास पालवे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक (PSI) तुषार गावंडे, पीएसआय रंगराव जाधव आणि त्यांच्या संपूर्ण अंमलदार व चालक पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अत्यंत चपळाईने या अट्टल चोरांना ताब्यात घेतले.
अशी झाली चोरी आणि तक्रार:
४ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी सागर प्रकाशराव वाकूडकर (वय ३४, रा. देवी नगर वडाळी, अमरावती) यांचे चुलत मामेभाऊ शुभम विनायकराव गेडेकर हे कामाच्या निमित्ताने सागर यांच्या मालकीची होंन्डा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी (क्र. MH 27 CP 1489, किंमत ४०,००० रुपये) घेऊन प्रभात चौक येथील पटेल यांच्या घरी गेले होते. त्यांनी गाडी लॉक करून उभी केली होती, मात्र दुपारी ३:३० च्या सुमारास काम आटोपून परत आले असता त्यांना दुचाकी तिथे दिसली नाही. शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने अज्ञात चोरांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २१८/२६ कलम ३०३(२) बीएनएस (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासातून आरोपी गजाआड:
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल चौकशी केली. या तपासादरम्यान पोलिसांनी ३ अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१. राहूल संतोष सोळंके (वय २४ वर्ष, रा. मरीमाता मंदिराजवळ, माळीपूरा, कारंजा लाड, जि. वाशिम)
२. लखन उत्तमराव चव्हाण (वय २६ वर्ष, रा. अळनगाव, ता. भातकुली, जि. अमरावती)

३. महादेव उत्तमराव चव्हाण (वय २८ वर्ष, रा. अळनगाव, ता. भातकुली, जि. अमरावती)
पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी अमरावती शहर तसेच इतर वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
जप्त केलेल्या दुचाकी आणि उघड झालेल्या गुन्ह्यांचा तपशील:
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ३,६०,००० रुपये किमतीच्या एकूण १० दुचाकी जप्त केल्या. त्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
| अ.क्र. | पोलीस स्टेशन | अप.क्र. व कलम | जप्त केलेली मोटार सायकल (क्रमांक / चेसिस-इंजिन क्रमांक) | अंदाजे किंमत |
| १ | सिटी कोतवाली | २१८/२६ क. ३०३ (२) BNS | होंन्डा सी बी युनिकॉर्न (MH 27 CP 1489) | ४०,०००/- रू |
| २ | सिटी कोतवाली | ९३०/२४ क. ३०३ (२) BNS | हिरो होंन्डा स्प्लेंन्डर (MH 27 AQ 0770) | २०,०००/- रू |
| ३ | सिटी कोतवाली | ५१८/२५ क. ३०३ (२) BNS | हिरो होंन्डा स्प्लेंन्डर प्लस (MH 27 AZ 2661) | २०,०००/- रू |
| ४ | सिटी कोतवाली | १८/२६ क. ३०३ (२) BNS | जुनी वापरती टीव्हीएस व्हिक्टर (चेसिस व इंजिन क्रमांकासह) | ४०,०००/- रू |
| ५ | राजापेठ | ८३१/२५ क. ३०३ (२) BNS | जुनी वापरती ॲक्टिव्हा ५जी (चेसिस क्रमांकासह) | ४०,०००/- रू |
| ६ | गाडगे नगर | १०४५/२५ क. ३०५ (ब) BNS | होंन्डा शाईन (चेसिस व इंजिन क्रमांकासह) | ५०,०००/- रू |
| ७ | दर्यापूर | ९२४/२४ क. ३०३ (२) BNS | जुनी वापरती हिरो एच एफ डिलक्स (चेसिस व इंजिन क्रमांकासह) | ४५,०००/- रू |
| ८ | दर्यापूर | १८०/२६ क. ३०३ (२) BNS | जुनी वापरती हिरो एच एफ डिलक्स (चेसिस व इंजिन क्रमांकासह) | ४०,०००/- रू |
| ९ | चंद्रपूर शहर | ७७५/२५ क. ३०३ (२) BNS | जुनी वापरती हिरो स्प्लेंन्डर प्लस (चेसिस व इंजिन क्रमांकासह) | ३५,०००/- रू |
| १० | – | – | जुनी वापरती हिरो होंन्डा स्प्लेंन्डर (चेसिस व इंजिन क्रमांकासह) | ३०,०००/- रू |
एकूण जप्त मुद्देमाल: १० मोटार सायकली (किंमत रु. ३,६०,०००/-)
कारवाई करणारे पोलीस पथक:
सदरची धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला साहेब, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) श्री. श्याम घुगे साहेब, आणि सहायक पोलीस आयुक्त (राजापेठ विभाग) श्री. संजय खताळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेचे नेतृत्व सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रोशन शिरसाट व क्राईम पो.नि. श्री. रामदास पालवे यांनी केले. तसेच प्रत्यक्ष कारवाईत डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक (PSI) तुषार गावंडे, पीएसआय रंगराव जाधव, आणि अमलदार मंगेश भेलाये, हरिष बुंदेले, प्रदीप राठोड, प्रमोद हरणे, मंगेश दिघेकर, अथर अली, निलेश कांडलकर, आकाश इंगोले, बाबुसिंग राठोड यांच्यासह ए.एस.आय. दिनेश मिश्रा, सुनिल विधाते, जीवन बांडे, सतीष कावळे, रामविजय गेडाम आणि चालक विश्वास गोंडाने, दिनेश जवजांळ, राजेश सदांशिवे व आनंद जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




