उमरेड पोलिसांची कामगिरी: २ चोरीचे गुन्हे उघड, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उमरेड: उमरेड पोलिसांनी धडक कारवाई करत चोरीचे दोन मोठे गुन्हे उघडकीस आणले असून, एका आरोपीला वाहनासह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १८ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 फिर्यादी आनंद प्रकाश कोंडावार (वय ४५ वर्षे, रा. नागपूर) यांनी ३ जुलै २०२६ रोजी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांनी ट्रॅपो रेडिएटर कंपनीसमोर, मोहपा रोडच्या कडेला उभा करून ठेवलेला त्यांचा ट्रक (क्र. एम एच-३१/सि क्यु ४१८९) हा यंत्रसामुग्रीसह २६ जून २०२६ ते २ जुलै २०२६ (दुपारी ४.०० वाजेपर्यंत) दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला होता. या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला होता.



पोलिसांचा तपास आणि अटक: नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, आणि उमरेड उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक  मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलिसांच्या तपास पथकाने या प्रकरणाचा शोध सुरू केला.

तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. या गुन्ह्यातील आरोपी अनिल श्रीराम चहाकर (वय ३२ वर्षे, रा. गणेशपुर, ता. खामगाव, जि. बुलढाणा, ह. मु. वार्ड क्र. ६, गंगापुर उमरेड) हा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.



दोन गुन्ह्यांची कबुली: पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने उमरेड पोलीस स्टेशन परिसरातून यंत्रसामुग्रीसह ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर, उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कान्हावा गावाच्या शिवारातून लोखंडी पाईप चोरी केल्याची माहितीही त्याने दिली. हे दोन्ही गुन्हे त्याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे उघड झाले आहे.

 मुद्देमाल जप्त: पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्हा करताना वापरलेले वाहन असा एकूण १८,३३,०००/- (अठरा लाख तेहतीस हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!