पोलिस महासंचालकांचे पदकाने वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी सन्मानित…
वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस महासंचालकांचे पोलिस पदकाने सन्मानित…
वर्धा (प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनानिमित्त (दि.26जानेवारी) रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे प्रजासत्ताक दिन सर्व अधिकारी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सोबत नागरीक, पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनी पोलिस महासंचालक यांच्या तर्फे देण्यात येणारे पोलिस पदक हे पोलिस अधिक्षक वर्धा यांच्या हस्ते पोलिस पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांना वाटप करण्यात आले. या मध्ये संदीप तिरमदास कापडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तथा सायबर सेल, वर्धा यांना दरोडेखोर / गुन्हेगारांच्या टोळ्या आणि अघोर व तंत्रबध्द गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराच्या विरूध्द केलेली कारवाई बाबत पोलिस पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच यामध्ये कुलदीप रविंद्र टांकसाळे, पोलिस हवालदार, सायबर सेल, वर्धा यांना क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चीत गुन्हयांची उकल केल्याबाबत पोलिस पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे अमर वसंतराव लाखे, पोलीस हवालदार, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, वर्धा यांना त्यांनी पंधरा वर्षाचा सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबाबत पोलिस पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पोलिस पदक प्राप्त उपरोक्त अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी केलेल्या कामगीरीबाबत पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकूमार कवडे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. जिल्हा क्रिडा संकूल येथे झालेल्या गणतंत्र दिवासाच्या कार्यक्रमादरम्यान सायबर साक्षरता अभीयान -2024 च्या सायबर पोलिस स्थानकाला प्रथम क्रमांक व रस्ते सुरक्षा अभियान – 2024 च्या वाहतूक शाखेच्या रथाला व्दितीय क्रमांक देण्यात आला. हे सदर पारीतोषीक व प्रमाणपत्र जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या हस्ते देण्यात आले.