गुप्तधनाचे लोभापोटी घेतला बळी दारव्हा पोलिसांनी केला उलगडा २ आरोपी अटकेत…
दारव्हा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन दारव्हा येथे दि. 06/09/23 रोजी देवराव रामजी बदुकले हे त्यांचे शेतातील विहीरीत म्रुतावस्थेत मिळुन आल्याने त्यांचे पत्नीचे तक्रारवरुन पोलिस स्टेशन दारव्हा येथे 52/23 कलम 174 सी. आर पी सी प्रमाणे अकस्मात म्रुत्यु ची नोंद घेवुन पो स्टे दारव्हा यांनी तपास सुरु केला त्यानुसार यातील मृतक देवराव रामजी बटुकले वय 52 वर्ष रा. शिवाजी चौक दारव्हा ता. दारव्हा जि. यवतमाळ. चे नातेवाईकांचे बयाण नोंदविले असता त्यांनी मृतकाच्या मरणाबाबत संशय व्यक्त होत होता कारण म्रुतक यास पोहता येत असल्याने त्याचा विहिरिच्या पाण्यात बुडुन मृत्यु होऊ शकत नसुन त्याचा मरणाच्या अनुषंगाने घातपात झाला असावा असे त्यांनी त्याच्या बयाणात सांगितले असता, पोलिसांनी अतिशय सावधगिरीने व गुप्तरित्या सदर प्रकरणात तांत्रिक पध्दतीने तपास केला. तांत्रिक व ठोस पुरावे हाती लागताच अप क्र 870/23 भादंवि कलम 304,201, सह महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानूष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ चे कलम 3 (क) (ड) प्रमाणे दाखल केला. त्यानुसार प्रशांत विठोबा चिरडे व गंगाधर किसन नेवारे दोन्ही रा. दारव्हा यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे
चौकशी केली असता यातील प्रशांत चिरडे यांने कबुली दिली की, कारंजा लाड येथील त्याचे ओळखीचे विनेश कारिया याचे अतिशय जुनाट घरात दि. 02/09/23 रोजी गुप्तधन काढण्याच्या लालसेपोटी खोदकाम केले गंगाधर नेवारे व म्रुतक देवराव रामजी बदुकले हे खोदकाम करित होते प्रशांत चिरडे व विनेश रामजीभाई
कारिया हे तेथे हजर होते आठ फुट खोल खड्यात सुमारे दहा फुट आडवे भुयार खोदले त्याचवेळी जमिनीचा वरील ढाचा कोसळुन त्यात देवराव बटुकले दाबला जावुन तेथेच मयत झाला. यानंतर आरोपींनी मयताचे प्रेत दारव्हा शिवारातील एका विहीरीत टाकुन पुरावा नष्ट केला. यावरुन पोलिसांनी प्रशांत विठोबा चिरडे, गंगाधर
किसन नेवारे व विनेश रामजीभाई कारिया या तीन आरोपींना सदर गुन्ह्यात अटक केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डाँ, पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक . पियुष जगताप सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन दारव्हा आणि स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी संयुक्तपणे केला असुन सदरचा गुन्हा पोलिस
निरीक्षक विलास कुलकर्णी ठाणेदार पो स्टे दारव्हा तसेच स्थानिक गुन्हे शाखा चे स.पो.नि. गणेश वनारे, यांनी उघडकीस आणला गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. विलास कुलकर्णी, स.पो. नि. गजभिये, पो उपनि रत्नपारखी, पोहेका रविन्द्र मोर्लेवार, सुनिल राठोड, नापोका सुरेश राठोड, मोहसीन चव्हाण हे करित आहेत.