नांदगाव पेठ हद्दीतील खुनाचा गुन्हा गु्न्हे शाखा युनीट २ ने ४ तासाचे आल केला उघड,सर्व आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ ने पो.स्टे. नांदगावपेठ येथील खुनाच्या गुन्हयाची चार तासात उकल करून गुन्हयातील सर्व ५ आरोपींनाकेली  अटक…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३१ मे २०२५ रोजी पोलिस स्टेशन नांदगावपेठ येथे अप. क. १८२/२०२५ कलम १०३ (२), ११५ (२), ११८ (१), १९१ (२), १९१ (३), १९० भा.न्या.सं. प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकिस यावा म्हणुन पोलिस आयुक्त अरविंद चावरिया  यांनी गुन्हे शाखेला आदेशीत केल्यावरून विविध पथके तयार करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ कडून सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना घटनास्थळावरील सिसिटीव्ही फुटेज वरून ५ आरोपींना निष्पन्न करुन सदरचा गुन्हा केल्याचे दिसून येत होते.





त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस  निरीक्षक बाबाराव अवचार यांचे नेतृत्वात पथकाने गोपनिय माहीती कढून करून अत्यंत कौशल्यपुर्ण पध्दतीने गुन्हयातील सर्व आरोपींची ओळख पटवून गुन्हयातील सर्व आरोपी हे अमरावती ग्रामीण हददीतीतल मालखेड जवळील जंगलात लपुन असल्याची माहीती मिळवली. त्या माहीतीच्या आधारे आरोपी  १) सुनिल सुरेश वानखडे, वय ३५, रा.जि.प. शाळेजवळ शेगाव अमरावती, २) दिपक सुधिर निस्ताने वय २५, रा. मालखेड, जि. अमरावती, ३) रोहीत अशोक खंडारे, वय २४, रा. मालखेड, जि. अमरावती, ४) विक्की उमेश शेंडे, वय २३, रा. मालखेड, जि. अमरावती, ५) अक्षय वसंत चव्हाण, वय १९ रा.लालखेड अमरावती यांना मालखेड चे जंगल परिसरातून गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने रात्रीचे दरम्यान मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना बारकाईने सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांना पुढील कारवाई करीता पो.स्टे. नांदगावपेठ यांच्या ताब्यात देण्यात आले.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त  अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त  सागर पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. बाबाराव अवचार यांचे नेतृत्वात सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोलिस अंमलदार महेंद्र येवतीकर, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, विशाल वाकपांजर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, संदीप खंडारे, राहुल दुधे, यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!