गडचिरोली: मौजा आंधळी येथील घरफोडीचे आरोपी २४ तासांत गजाआड; मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मौजा आंधळी येथे घरफोडी करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलीसांकडून २४ तासांच्या आत अटक; मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांनी सर्व पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, पोस्टे कुरखेडा येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मौजा आंधळी येथे घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन २४ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची यशस्वी कामगिरी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक  एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी., आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा)  रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



घटनेचा सविस्तर तपशील:

मौजा आंधळी येथील रहिवासी श्री. अशोककुमार वाघमारे हे दिनांक १२ जून २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत आपल्या घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले नगदी ३,०००/- रुपये, मातीच्या गुल्लकमधील (पिग्गी बँक) अंदाजे ७,०००/- रुपये आणि लाकडी कपाटात ठेवलेला ५०,०००/- रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, असा एकूण ६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे अप. क्र. १३५/२०२६, कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीसांसमोरील आव्हान आणि आरोपींना अटक:

आरोपींनी घटनास्थळावर कोणताही पुरावा न सोडल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, कुरखेडा पोलीस पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत शिताफीने तपास करत दोन आरोपींना १६ जून २०२६ रोजी अटक केली.



अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१) वैभव समीर जांभूळकर (वय २९ वर्षे)



२) गणेश देविदास भैसारे (वय ३३ वर्षे) (दोघेही राहणार: आंधळी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)

मुद्देमाल हस्तगत आणि पुढील तपास:

अटक केल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीदरम्यान पोलीसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला ५६,०८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल (१० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम) हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कुरखेडा पोलीस स्टेशनच्या मसपोनि. प्रियंका आघाव करीत आहेत.



तपास पथक आणि मार्गदर्शन:

कुरखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात मसपोनि. प्रियंका आघाव, पोहवा/मडावी, पोअं/कोरे, गुडा, आणि चापोअं/महारे यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!