नागपूर: बकरी चोरीचे १२ गुन्हे उघड; ३ आरोपींना अटक करून ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बकरी चोरीचे १२ गुन्हे उघड; ३ आरोपींना अटक, ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एक मोठी कारवाई करत १२ बकरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून वाहनासह एकूण ४ लाख ५१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यह कामगिरी वरिष्ठ पोलीस अधीक्षक  हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक  अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१ जून २०२६ रोजी करण्यात आली.



अटक करण्यात आलेले आरोपी

गोपनीय माहिती आणि सायबर पोलीस स्टेशनच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुमथाळा परिसरातून खालील ३ आरोपींना ताब्यात घेतले:

  1. जावेळ उर्फ सोनु जुल्फीकार अन्सारी (वय ३७ वर्षे), रा. नवीन वस्ती टेका नाका, गोसमंडी जवळ, नागपूर.



  2. रोहीत अशोक खोब्रागडे (वय ३७ वर्षे), रा. विनोबा भावे नगर, यशोधरा नगर, नागपूर.

  3. समीर शरीफ शेख (वय ३० वर्षे), रा. नवीन वस्ती, टेका नाका, नागपूर.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

जप्त केलेली वस्तू/रक्कम अंदाजे किंमत (रुपये)
ह्युंडाई आय २० कार (क्र. MH 01 AR 4012) – चोरीसाठी वापरलेली २,००,०००/-
३ मोबाईल फोन २२,०००/-
रोख रक्कम (चोरीच्या बकऱ्या विकून मिळालेली) २,२९,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल ४,५१,०५०/-

उघडकीस आलेले १२ गुन्हे

आरोपींच्या अटकेमुळे खालील पोलीस ठाण्यांतर्गत नोंद असलेले गुन्हे (कलम ३०३ (२) भान्यासं नुसार) उघडकीस आले आहेत:



  • वडोदा पोलीस स्टेशन: अप क्र. १९६/२६ आणि अप क्र. १७७/२६

  • केळवद पोलीस स्टेशन: अप क्र. ५५/२६, अप क्र. ११६/२६, आणि अप क्र. २००/२६

  • खापा पोलीस स्टेशन: अप क्र. १२९/२६

  • कळमेश्वर पोलीस स्टेशन: अप क्र. ४३१/२६ आणि अप क्र. ५६७/२६

  • कान्हान पोलीस स्टेशन: अप क्र. १६/२६

  • नरखेड पोलीस स्टेशन: अप क्र. ४१२/२६ आणि अप क्र. ४७८/२६

  • रामटेक पोलीस स्टेशन: अप क्र. १८६/२६







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!