हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार महिलेसह ६ आरोपींना चंदनझिरा पोलिसांकडून अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलिसांनी हनी ट्रॅप आणि अश्लील व्हिडिओ बनवून पैशांची लूट करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य सूत्रधार महिलेसह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹२.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना काय होती?

चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन मोंढा रोड परिसरातून एका बोलेरो चालकाचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्याला जबरदस्तीने वाहनात कोंबून ड्रायपोर्ट परिसरात नेले, तिथे त्याला मारहाण केली आणि त्याचे रोख पैसे व मोबाईल हिसकावून घेतला. एवढेच नव्हे तर, त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडून ‘फोनपे’ (PhonePe) द्वारे जबरदस्तीने पैसे मागवून ते आरोपींच्या खात्यावर वर्ग करून घेतले. याप्रकरणी २३ जून २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोहेकॉ कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अशोक जाधव, अभिजीत वायकोस, सागर खैरे, महिला पोलीस सखु शिंदे आणि अनुराधा बांडे यांच्या पथकाने पार पाडली. 



 पोलिसांची कारवाई आणि तपास

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधु आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली.

  • मुख्य सूत्रधार जेरबंद: गुन्ह्याची मुख्य सूत्रधार असलेली सराईत आरोपी सपना संतोष निकाळजे (वय २३ वर्षे) हिचा बुलढाणा जिल्ह्यात पाठलाग करून देऊळगाव राजा रोडवरील पेट्रोल पंपाजवळून तिला ताब्यात घेण्यात आले.



  • ४ तासांत इतर आरोपी अटक: तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४ तासांत उर्वरित आरोपींना गजाआड केले.

  • हनी ट्रॅपचे गुन्हे: प्राथमिक तपासात मुख्य आरोपी सपना निकाळजे ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधीच हनी ट्रॅप स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.



 अटक करण्यात आलेले आरोपी

१) सपना संतोष निकाळजे (वय २३ वर्षे) २) अविनाश गणेश झोटे (वय २६ वर्षे) ३) अर्जुन चमन बहादूर राजपूत (वय ३४ वर्षे) ४) शंकर माणिक जाधव (वय २६ वर्षे) ५) अतिष सतीश गायकवाड (वय १९ वर्षे) ६) सचिन लक्ष्मण कंठाळे (वय ३२ वर्षे – ज्याच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले होते)

 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि लुटलेली रोख रक्कम असा एकूण ₹२,६१,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.



 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!