कास रस्त्यावरील सांबरवाडी नाकाबंदीत सराईत गुन्हेगार जेरबंद; देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सातारा:- कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सदरची धडक कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

हुल्लडबाजांना लगाम घालण्यासाठी नाकाबंदी:- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धबधबे, घाट माथा परिसर आणि नदीकाठच्या गावांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये काही हुल्लडबाज मुलांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि कोणतीही जीवितहानी टाळता यावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी नाकाबंदी व मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती.



आरोपीचे नाव :- श्रेयश दशरथ जाधव वय 20 वर्ष राहणार रविवार पेठ सातारा ता जि सातारा

पोलीसांना चकवा देऊन पळण्याचा प्रयत्न  मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सांबरवाडी येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी करत होते. यावेळी तोंडाला मास्क लावलेला एक तरुण होन्डा ॲक्टिव्हा दुचाकीवरून (क्र. MH 11 EB 1239) कासच्या दिशेने जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने नाकाबंदीत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार चव्हाण, घोरपडे आणि निकम यांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला जागीच पकडले.



डिकीची झडती घेताच पिस्तूल जप्त:- पोलिसांनी संशयिताकडे त्याचे नाव, पत्ता आणि गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दुचाकीच्या डिकीबाबत विचारले असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी तात्काळ दोन पंचांना बोलावून गाडीच्या डिकीची झडती घेतली. यावेळी डिकीमध्ये सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल, काडतूस, दोन मोबाईल हँडसेट आणि दुचाकी असा एकूण १,९६,००० रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपी श्रेयश जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनु शिंदे करत आहेत.



यांनी केली कामगिरी:-  या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, मुजावर, चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सोनु शिंदे, पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, रायसिंग घोरपडे आणि अजित निकम यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!