चिरमुर्याच्या पोत्यांआड गुटखा वाहतूक: साताऱ्यात २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सांगलीतून पुण्याच्या दिशेने चिरमुर्याच्या पोत्यांआड गुटख्याची वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेकडून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा: महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेला विमल पानमसाला व तंबाखू (गुटखा) चिरमुर्याच्या पोत्यांच्या आड लपवून घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत ८९५.८ किलो अवैध गुटखा व ट्रकसह एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयित मछिंद्र आकाराम कांबळे (वय ५४, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.



स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना बातमीदारांमार्फत गोपनीय माहिती मिळाली होती की, ट्रक क्रमांक MH 10 / Z 4696 मधून मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला गुटखा सांगली बाजूकडून पुणे बाजूकडे महामार्गाने नेला जात आहे. या बातमीच्या आधारे सपोनि रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सातारा तालुक्यातील नागठाणे येथील हायवे ब्रीजजवळ सापळा रचला.

दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास संशयित ट्रक थांबवून पाहणी केली असता, ट्रकमध्ये समोरच्या बाजूने चिरमुर्याची पोती रचलेली होती. मात्र, पोत्यांच्या आड लपवून ठेवलेला विमल पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा पोलिसांना आढळून आला.



जप्त केलेला मुद्देमाल:

  • अवैध गुटखा/पानमसाला: रु. १७,६५,९४०/- (वजन ८९५.८ किलो)

  • वाहन (ट्रक MH 10 / Z 4696): रु. ७,५०,०००/-



  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. २५,१५,९४०/-

या घटनेची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे यांनी घटनास्थळी हजर राहून मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २३४/२०२६ (अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कारवाई करणारे पथक:

ही धडाकेबाज कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक  निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक  डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली:

  • एलसीबी: पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, सपोनि प्रशांत हुले, मच्छिंद्रनाथ पाटील, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, अमित झेंडे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अमित सपकाळ, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, किरण जगताप, लैलेश फडतरे, ओंकार यादव, अमित माने, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम.

  • बोरगाव पो.स्टे.: दिपकुमार मांढवे, निलेश गायकवाड, सुनिल कर्णे, जगदीश कणसे, विशाल जाधव, धीरज महाडीक, ज्ञानेश ढाणे, केतन जाधव व अमोल कणसे यांच्या पथकाने केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!