जालना एमआयडीसीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा: ७ ठिकाणी धाडी, ७ जण अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

एमआयडीसी भागात अवैध दारू विक्रीवर चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई; ७ ठिकाणी धाडी टाकत ७ आरोपी अटकेत

जालना: चंदनझिरा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. जालना शहरातील एमआयडीसी भागात लपून-छपून व चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या ७ वेगवेगळ्या ठिकाणांवर चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट २०२६ रोजी छापेमारी केली.



या धडक कारवाईत पोलिसांनी देशी, विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू असा एकूण ३०,१० cut रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

कारवाईत निष्पन्न झालेले आरोपी:



१. सुरेश दगडू गवारे (वय ३०, रा. कुंभेफळ, सध्या रा. साई ढाबा, एमआयडीसी, जालना)

२. रतन बाबूराव साळवे (वय ५०, रा. पाचनवडगाव, सध्या रा. एमआयडीसी, जालना)



३. सोपान रमेश सोळुंके (वय २२, रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना)

४. वैभव पांडुरंग उंडे (वय २६, रा. बोधलापुरी, ता. घनसावंगी, सध्या रा. एमआयडीसी, जालना)



५. राज टेकबहादूर सुनार (वय ४३, सध्या रा. साठ फुटी रोड, चंदनझिरा, जालना)

६. धनंजय जानकीराम देव्हडे (वय ४९, रा. काद्राबाद, जालना)

७. एक महिला आरोपी (रा. चंदनझिरा, जालना)

पोलीस पथक:

ही कामगिरी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक  विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, मनसुब वेताळ, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, शिवाजी जमधडे, सुभाष पवार, अभिजित वायकोस, शरद पवार, सागर खैरे, रेश्मा गुरुम आणि शैला लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!