अमरावतीत ५३ लाखांचे एम.डी. ड्रग्ज जप्त; राजस्थानमधून आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावतीत मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानमधून आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार राजापेठ पोलिसांच्या जाळ्यात

अमरावती:



अमरावती शहर पोलिसांच्या ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटवर मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील अमली पदार्थांच्या पुरवठ्याचा मुख्य सूत्रधार रामनिवास जगदिशकुमार बिश्नोई (वय २२ वर्षे, रा. डुंगरवा, जि. जालोर, राजस्थान) याला पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने थेट राजस्थानमधून अटक केली आहे.

पहिली कारवाई: ५३ लाखांच्या मुद्देमालासह स्थानिक तस्कर जेरबंद



१ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ७.०० वाजताच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने शिवाजी संकुल, अकोली रोड परिसरात छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी साहील राजेश मेहरा (वय २२ वर्ष, रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती) यास ताब्यात घेऊन एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत त्याची झडती घेतली असता ५३ लाख २९ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:



    • मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर: अंदाजे किंमत ₹४१,५५,०००/-

    • इको स्पोर्ट्स (EcoSport) चारचाकी वाहन: अंदाजे किंमत ₹१०,००,०००/-



    • ॲपल (Apple) कंपनीचे २ मोबाईल फोन: अंदाजे किंमत ₹१,७०,०००/-

    • इलेक्ट्रॉनिक वजन काटा: अंदाजे किंमत ₹४,०००/-

    • इतर साहित्य: चमचा, रबर आणि ‘Target Re-Lock LD Bags’ कंपनीच्या पारदर्शक लहान पिशव्या.

या प्रकरणी पोलीस ठाणे राजापेठ येथे अपराध क्रमांक ६९७/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८(c), २१(c), २२(c), २८ आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

तांत्रिक तपासातून राजस्थान कनेक्शन उघड

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुढे नेण्यात आला. आरोपी साहील मेहरा याने व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे राजस्थानमधील मुख्य पुरवठादाराशी वारंवार संपर्क साधून हे अमली पदार्थ अमरावतीत मागवल्याचे उघड झाले.

राजापेठ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ राजस्थानला रवाना झाले. तेथे काही दिवस रात्रंदिवस वेशांतर करून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने रामनिवास जगदिशकुमार बिश्नोई (वय २२ वर्ष, रा. जालोर, राजस्थान) याला पोलीस ठाणे जालोर हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही धडक कामगिरी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त  राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परी-२) श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

  • नेतृत्व: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि स.पो.नि. नितीन शिंदे.

  • सहभाग: पोलीस अंमलदार मनिष करपे, पंकज खटे, रवि लिखितकर, शशीकांत शेळके, पवन तिवारी, अर्जुन कदम, रफिक खान, अंकुश काळे, पंकज गाठे, आकाश यादव, प्रशांत बोलोरकर आणि अमोल देशमुख.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!