अमरावती: करजगाव येथे अवैध गोवंश तस्करीवर धाड, ५ आरोपींवर गुन्हे दाखल करत ९.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती (ग्रामीण): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या पथकाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता करजगाव येथील कुरेशी मोहल्ला येथे धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ९,२५,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कुरेशी मोहल्ला येथे पंचांसमक्ष टाकलेल्या छाप्यात एकूण ४२ जिवंत गोवंश जनावरे, २३० किलो गोमांस आणि मांस कापण्याचे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या कोणत्याही जनावराला ‘Ear Tagging’ (कान टोचून लावलेला बिल्ला) नसल्याने ही जनावरे कत्तलीसाठीच आणल्याची खात्री पोलिसांना पटली.



आरोपी आणि जप्त मुद्देमालाचा तपशील:

  • शेख फिरोज अब्दुल अजीज (वय ३८, रा. जामपुरा, करजगाव): याच्या घरामधून २२ गोवंश जनावरे (३,९३,००० रु.), १०० किलो गोमांस (२०,००० रु.) व साहित्य, असा एकूण ४,१५,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. (अपराध क्र. ३३६/२०२६, फरार).



  • शेख दानिश शेख मुश्ताक (वय २५, रा. जामपुरा, करजगाव): याच्या घरातून ६ गोवंश जनावरे (१,९५,००० रु.), ५० किलो गोमांस (१०,००० रु.) व साहित्य, असा एकूण २,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (अपराध क्र. ३३७/२०२६, फरार).

  • साहील शेख आझाद (वय ३०, रा. जामपुरा, करजगाव): याच्या घरातून ८ गोवंश जनावरे (१,४२,००० रु.), ४० किलो गोमांस (८,००० रु.) व साहित्य, असा एकूण १,५०,५०० रुपयांचा मुद्दामाल जप्त करण्यात आला. (अपराध क्र. ३३८/२०२६).



  • शेख सहदु शेख वाहब (वय ५०, रा. करजगाव): याच्या घरातून ६ गोवंश जनावरे (१,४५,००० रु.), २० किलो गोमांस (४,००० रु.) व साहित्य, असा एकूण १,४९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. (अपराध क्र. ३३९/२०२६).

  • शेख जुनेद शेख जमील (वय २५, रा. करजगाव): याच्या घरामधून २० किलो गोमांस (४,००० रु.) व साहित्य, असा एकूण ४,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (अपराध क्र. ३४०/२०२६).



पुढील कारवाई व गौशाळेत रवानगी: जप्त करण्यात आलेल्या ४२ गोवंश जनावरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची करजगाव येथील पशुपती गौशाला चॅरिटेबल ट्रस्ट येथे रवानगी करण्यात आली आहे. तसेच जप्त केलेले २३० किलो गोमांस शिरजगाव कसबा येथील मेघा नदीच्या पात्रात खड्डा खोदून पंचांसमक्ष पुरण्यात आले. सर्व आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांवर क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक  निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी (अचलपूर)  माधवराव रा. गरूड आणि एलसीबी निरीक्षक  अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमन भि. सिरसट, पोउपनि प्रशांत जाधव व पोलीस अमंलदारांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!