
अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनची धडक कारवाई: घरफोडी प्रकरणी आरोपीला अटक, मुद्देमाल जप्त
अंजनगाव सुरजी (१४ ऑगस्ट २०२६):
अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नेमकी घटना काय?
ग्राम चौसाळा येथील रहिवासी सुनिल देविदास मेतकर (वय ५७ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ९ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या राहत्या घराला कुलूप लावून अकोला येथे गेले होते. ११ ऑगस्ट २०२६ रोजी घरी परत आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.
घरात जाऊन पाहणी केली असता, सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. शेतीच्या कामासाठी घरात कपाटाच्या घडीत ठेवलेले २५,००० रुपये रोख आणि सुमारे २५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने/वस्तू (एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल) चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्यात अपराध क्र. ४०७/२०२६ (कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्रे आणि आरोपीस अटक
हद्दीत घरफोडीचे गुन्हे वाढल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकातील अमलबुध्दी व अंमलदार यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली.
-
तांत्रिक व गोपनीय माहिती: तपासादरम्यान फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी कुलदीप बंडू काळमेघ (वय २८ वर्षे, रा. ग्राम चौसाळा, ता. अंजनगाव सुरजी) याला ताब्यात घेण्यात आले.

-
गुन्ह्याची कबुली: पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
-
मुद्देमाल जप्त: आरोपीने शेतातील गोठ्यात लपवून ठेवलेला २५,००० रुपये रोख मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे.

मार्गदर्शन व पोलीस पथक
सदरची यशस्वी कारवाई:
-
पोलीस अधीक्षक: निकेतन कदम सर
-
अपर पोलीस अधीक्षक:दत्ता तोडवाड सर
-
उपविभागीय पोलीस अधिकारी: सुनिल हुड सर
यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार, अंजनगाव सुरजी (पोलीस निरीक्षक सुरज बोंडे), पोउपनि भारत चिरडे, पोहेकॉ. जयसिंग चव्हाण, पोकॉ रवी राठोड, पोकॉ अमित घाटे, पोकॉ शुभम मार्कंड आणि पोकॉ मोहसिन पठाण यांनी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि भारत चिरडे करत आहेत.




