
घरफोड्यांच्या ०६ गुन्ह्यांची उकल; अकोला पोलिसांची धडक कारवाई, २.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ०६ घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा शोध लावून पोलिसांनी आरोपींकडून २,९१,८३१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे:
फिर्यादी श्री. विनोद रामरतन सरप (वय ४६ वर्ष), रा. देशमुख मंगल कार्यालयाजवळ, लक्ष्मी नगर, डाबकी रोड, अकोला हे आपल्या परिवारासह बाहेर गावी शेतात गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील संडास/बाथरूमच्या व्हेंटिलेशन खिडकीची लोखंडी जाळी कापून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता.

याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपास व आरोपींना अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार मा. पोनि दीपक कोळी यांच्या आदेशाने सपोउपनि दीपक तायडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवले.

तपासादरम्यान खालील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली:
-
शेख सादीक शेख हैदर (वय १९ वर्ष, रा. नेहरूनगर, अकोला)

-
मोहम्मद रिझवान शेख इरफान (वय २१ वर्ष, रा. भारतनगर, अकोला)
तसेच, त्यांच्यासोबत असणाऱ्या खालील फरार व अल्पवयीन साथीदारांची नावे समोर आली:

-
अरबाज लोचु (रा. संभाजी नगर)
-
वि. स. बालक अ. ब. क. (वय १३ वर्ष, रा. अकोला)
-
वि. स. बालक अ. ब. क. (वय १६ वर्ष, रा. अकोला)
जप्त केलेला मुद्देमाल
संशयितांकडे कसून चौकशी केली असता, डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ०६ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली. आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
-
सोन्याची अंगठी: १ (वजन ५ ग्रॅम, किंमत ₹४७,९७६/-)
-
सोन्याची लगड: १ (वजन ५.३० ग्रॅम, किंमत ₹४७,७५५/-)
-
एक लगड: (६.४० मि.ग्रॅम सोनं, एकूण वजन १६.७० मि.ग्रॅम, किंमत ₹८४,०००/-)
-
नगदी रक्कम: ₹२३,९००/-
-
मोबाईल फोन: १ (किंमत ₹१०,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹२,९१,८३१/- (दोन लाख एक्याण्णव हजार आठशे एकतीस रुपये)
कारवाई करणारे पोलीस पथक
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
-
पोलीस निरीक्षक: दीपक कोळी
-
सपोउपनि: दीपक तायडे
-
पोलीस अंमलदार: अ. फईम, सुनिल टोपकर, उमेश पाटील, प्रविण इंगळे, संतोष उपाध्याय, उमेश सुगंधी, राजेश ठाकुर, मयुर उमाळे, मंगेश गिते (पो.स्टे. डाबकी रोड, अकोला).
सदर बातमी पत्रक अकोला जिल्हा पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हारकर यांनी प्रसिद्धीसाठी जारी केले आहे.




