
अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ८ जुगार अड्ड्यांवर छापे; ३४ जणांना अटक, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला :-
अकोला जिल्हयातील अवैध जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या धडक कारवाईत जिल्हभरातील ८ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, ३ लाख ८८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणेनिहाय करण्यात आलेली कारवाई:
-
डाबकीरोड पोलीस ठाणे: वाल्मीकी नगर येथे छापा टाकून श्रीधर शामतकर, ऋषिकेश राऊत, शेख शारिक यांच्यासह १६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जुगार साहित्य, मोबाईल व रोकड असा एकूण १,५०,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

-
खदान पोलीस ठाणे: डायमंड शाळेसमोर छापा टाकून शेख सोहेल, शेख रिजवान, मोहम्मद जुनेद व वसीमोद्दीन या ४ आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगार साहित्य, मोटारसायकल, मोबाईल व रोकड असा एकूण २,१६,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-
पातूर पोलीस ठाणे: आठवडा बाजार परिसरातून संतोष कांबळे, शेख नईम व फारूखखान (मुद्देमाल रु. ५,५००) तसेच विजय सिनेमा टॉकीजजवळून रोशन वानखडे व श्रीकृष्ण इंगळे (मुद्देमाल रु. ३,५००) अशा एकूण ५ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

-
अकोट शहर पोलीस ठाणे: दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून राहुल नवलकर, विशाल राजुभाऊ, राजेश शेंडे (मुद्देमाल रु. ४,१००) आणि जयदेव तेलगोटे, उदित निंबाळकर, नंदू डोंगरे (मुद्देमाल रु. ३,६००) अशा एकूण ६ आरोपींना जुगार साहित्यासह ताब्यात घेण्यात आले.
-
बोरगाव मंजू पोलीस ठाणे: रामनगर-सोनाळा रोडवरून विनोद मोहोड व राजेश नेमाडे (मुद्देमाल रु. ३,०५०) आणि बागवानपुरा येथून साहेब खाँ शेर खाँ (मुद्देमाल रु. २,१६०) अशा ३ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक व पथक:
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउनि माजीद पठाण, विष्णु बोडखे, अनिल चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.




