अमरावती शहरात गुन्हे शाखेची जुगारावर धाड; एकाला ताब्यात घेऊन १०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती :-

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ०१ च्या पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरीया नगर भागात मोठी कारवाई करत अवैध जुगारावर छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान एका आरोपीला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



कारवाईचा सविस्तर तपशील: अमरावती शहर गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार ५ सप्टेंबर २०२६ रोजी गाडगेनगर हद्दीत गस्त घालत असताना, खैरीया नगर येथे जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पथकाने तात्काळ छापेमारी केली.

  • ताब्यात घेतलेला आरोपी: शेख अलबक्श शेख मन्नान उर्फ गोलू (वय २४ वर्षे, रा. अलहीलाल कॉलनी, अमरावती).



  • जप्त केलेला मुद्देमाल: ५२ ताश पत्ते व इतर जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम (एकूण किंमत १०,३००/- रुपये).

  • गुन्ह्याची नोंद: आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये (म.जु.का.) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:

सदर धडक कारवाई अमरावती शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपआयुक्त श्री. यशवंत सोळंके (परिमंडळ-०१), मा. पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) श्रीमती प्रांजली सोनावणे, आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गाडगेनगर विभाग) निलेश ब्राम्हणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.



कारवाई करणारे पोलीस पथक:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक दशरथ आडे, सहा. पो.उ.नि. फिरोज खान, पो.हवा. मंगेश लोखंडे, पो.हवा. संभाजी केन्द्रे, पो.हवा. संजय भारसाकळे, पो.हवा. नाझिमोद्दीन सैयद, पो.ना. सचिन भोयर, तसेच पोलीस अंमलदार रंजित गावंडे, नरेश मोहरिल, सागर ठाकरे, निखील गेडाम आणि चालक चेतन शर्मा व प्रभात पोकळे (सर्व गुन्हे शाखा, अमरावती शहर) या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!