खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना गुन्हे शाखेची बेड्या; अमरावती पोलिसांची धडक कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने गाडगेनगर परिसरातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना अवघ्या काही तासांत निष्पन्न करून ताब्यात घेतले आहे.

घटना नेमकी काय?

  • दिनांक १०/१०/२०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील पलाश लाईन, राधा नगर, चौबे प्लाट येथे अज्ञात ४ ते ५ जणांनी एका इसमावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.



  • आरोपींनी एवढ्यावरच न थांबता परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

  • या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.



गुन्हा दाखल आणि पोलीस तपास

  • फिर्यादीच्या जबानीवरून अज्ञात आरोपींवुरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात  अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

  • गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी तातडीने घटनास्थळ गाठले.



  • सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषğच्या आधारे पोलिसांनी आरोपींची नावे निष्पन्न केली.

ताफतसात निष्पन्न व ताब्यात घेण्यात आलेले आरोपी

अमरावती शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे:



  1. यश संतोष पवार (वय १९ वर्षे, रा. मोतीबाग, महाविर कॉलनी, दारव्हा, जि. यवतमाळ, ह.मु. नामदेव महाराज गल्ली, गाडगेनगर, अमरावती).

  2. करण संतोष मुंदाने (वय २० वर्षे, रा. रानी लक्ष्मीबाई वार्ड, आर्वी, जि. वर्धा).

  3. समाधान गणेश कोल्हे (वय १८ वर्षे, रा. केवड, ता. केज, जि. बीड, ह.मु. नामदेव महाराज गल्ली, गाडगेनगर, अमरावती).

  4. दर्शन शंकर राऊत (वय १९ वर्षे, रा. सुभाष चौक, जामोद, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा, ह.मु. नामदेव महाराज गल्ली, इंगळे किराणा जवळ, अमरावती).

  5. एक विधि संघर्षित बालक (अल्पवयीन).

सदर आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसे, याबाबत सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कारवाई करणारे पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त  राकेश ओला, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२)  शाम घुगे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय)प्रांजली सोनावणे, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने (व.पो.नि. दिनेश दहातोंडे, पो.नि. अतुल वर्, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे व इतर अंमलदार) पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!