
अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
चारचाकी वाहन थांबवून वाहन चोरी करून गंभीर दुखापत करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
घटनेची सविस्तर माहिती
दिनांक ११/१०/२०२६ रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास वाशीम बायपास रोडवरून एक टोयोटा हायरायडर कार (क्र. MH 30 BW ६७९१) जात असताना, मद्रास गॅरेजसमोर अज्ञात आरोपींनी तक्रारदाराच्या गाडीचा दरवाजा उघडून पिस्तुलाचा धाक दाखवला आणि बळचस्तीने त्यांना खाली उतरवले.

आरोपींनी तक्रारदाराला मारहाण व चाकुने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांची १६ लाख रुपये किमतीची कार, दोन मोबाईल फोन सह इतर साहित्य जबरदस्तीने हिसकावून अमरावतीच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
कारवाईचा कालावधी: अवघ्या ३६ तासांच्या आत.

-
पकडलेले आरोपी: ३ वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील (नाशिक, नागपूर, वाशीम) एकूण ३ आरोपी.
-
जप्त मुद्देमाल: चोरीची चारचाकी वाहन, मोबाईल्स व इतर साहित्यांसह एकूण १८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

-
आरोपींची नावे व अटकेची माहिती
1. विक्की शांताराम रोकडे (वय २५ वर्षे, रा. घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) – अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव पेठ येथे नाकाबंदी करून चोरीच्या वाहनासह यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यात त्याच्या साथीदारांच्या मदतीची माहिती दिली.
-
2. करण रमेश चव्हाण (वय २२ वर्षे, रा. पिंपळा, ता. सावनेर, जि. नागपूर)

-
3.विनायक गजानन धोंगडे (वय २२ वर्षे, रा. नागठाणा, जि. वाशीम) – विनायक धोंगडे याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर त्याचे लोकेशन अकोला येथील पातुर रोड परिसरात आढळले. स्थानिक गुन्हे शाखेने पातुर रोड परिसरात शोधमोहीम राबवून हिंगणा ओव्हरब्रिजजवळून जात असताना या दोघांना ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
-
१ काळ्या रंगाची टोयोटा कंपनीची हाय-रायडर चारचाकी वाहन (क्र. MH 30 BW ६७९१).
-
७ विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल फोन.
-
३ काळ्या रंगाची बंदूकसारखी दिसणारी एरगन, छरे व आवाज करण्यासाठी वापरण्यात येणारे बारुडाचे साहित्य.
-
१ काळ्या रंगाची हिरो कंपनीची एक्स्ट्रिम मोटारसायकल (क्र. MH 40 DM १८३६).
-
एकूण जप्त मुद्देमाल: १८,७०,००० रुपये.
आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेहकर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.
-




