नागपुरात गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; १ लाख २० हजारांच्या गांजासह तीन तस्करांना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपूर:



शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत अमली पदार्थ (गांजा) बाळगणाऱ्या तीन तस्करांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लाख रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.



कारवाईची सविस्तर माहिती

दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०४:३० ते ०६:१० वाजण्याच्या सुमारास गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील ताजनगर टेका, इग्सार अन्सारी यांच्या घराजमोरील सार्वजनिक रोडवर सुझुकी मोपेड गाडीजवळ काही इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.

पथकाने संशयावरून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी खालीलप्रमाणे ओळख सांगितली:



१. सलमान अब्दुल रहमान अन्सारी (वय ३१ वर्षे, रा. प्लॉट क्र. ४४९, बिलाल मशिदीजवळ, यशोधरानगर चौक, नागपूर)

२. संदीप उर्फ भुऱ्या गणेश लिल्लारे (वय २२ वर्षे, रा. आराधना नगर, हनुमान मंदिरजवळ, बिडगाव, भांडेवाडी, नागपूर)



३. अतीकुर रेहमान मोबीन रेहमान अन्सारी (वय २९ वर्षे, रा. प्लॉट नं. १४४९, योगी अरविंद नगर, यशोधरानगर, नागपूर)

एनडीपीएस कायद्यांतर्गत झडती व जप्ती

तिघांकडे अमली पदार्थ असल्याचा दाट संशय आल्याने पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करत पंचसमक्ष त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्या ता्यात हिरव्या रंगाचा गांजा एकूण वजन १ किलो २०० ग्रॅम (अंदाजे किंमत १,००,०००/- रुपये) आढळून आला.



तस्करांच्या ताब्यातून गांज्यासह दोन मोबाईल फोन आणि एक सुझुकी ॲक्सेस मोपेड गाडी असा एकूण २,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळले.

पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपींचे हे कृत्य एनडीपीएस ॲक्टच्या कलम ८(क), २०(ब)(ii), २९ नुसार होत असल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे पाचपावली येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मुद्देमालासह त्यांना पुढील तपासासाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

सदर यशस्वी कारवाई  पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)  राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!