वर्ध्यात एलसीबीची मोठी कारवाई; ४.५९ लाखांच्या मुद्देमालासह २४५ लिटर दारू जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


वर्धा :-

जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम उघडली आहे. पोलीस स्टेशन तळेगाव (शा.) च्या हद्दीत करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी मोहा दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पती-पत्नीला ताब्यात घेऊन ४ लाख ५९ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.



उड्डाणपुलाखाली सापळा रचून कारवाई

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. त्यादरम्यान अवैध दारूची मोठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच पथकाने आष्टी टी-पॉइंट येथील उड्डाणपुलाखाली अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचला.



काही वेळातच त्या ठिकाणी आलेल्या एका फिकट सोनेरी रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारला पोलिसांनी थांबवून तिची कसून पाहणी केली.



कारमध्ये आढळल्या प्लास्टिकच्या कॅन्स

वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेच्या ७ मोठ्या प्लास्टिक कॅन्स आढळून आल्या. या कॅन्समध्ये एकूण २४५ लिटर अवैध गावठी मोहा दारू भरलेली होती.

याप्रकरणी पोलिसांनी कारमधील आरोपी नितीन मनोहर मोहळे आणि त्यांची पत्नी सौ. दिपाली नितीन मोहळे यांना रंगेहात पकडले.



प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपींनी ही दारू रणवीर पवार (रा. भिवापूर, सारवाडी पारधी बेडा, ता. आष्टी, जि. वर्धा) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. सध्या आरोपी रणवीर पवार हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल:

पोलीस कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:



  • गावठी मोहा दारू (२४५ लिटर): अंदाजे मूल्य रु. ५१,१०-

  • मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्र. MH-31-CN-3914): अंदाजे मूल्य रु. ४,००,०००/-

  • ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल: अंदाजे मूल्य रु. ८,०००/-

  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. ४,५९,१००/-

  • मार्गदर्शन व यशस्वी कामगिरी करणारे पथक

    ही धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    कारवाईत प्रत्यक्ष सहभाग असलेले पथक:

    •  विनोद चौधरी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)

    • खुशालपंत राठोड (सफो)

    • दीपक जंगले (पोलीस हवालदार)

    •  रितेश कुऱ्हाडकर,. मंगेश आदे,  सुमित शेंदरे (सर्व पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)

    सध्या या प्रकरणातील पसार आरोपीचा शोध घेतला जात असून, या नेटवर्कशी जोडलेल्या इतर व्यक्तींचाही तपास तळेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत केला जात आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!