एमआयडीसी नांदगाव पेठ येथील हिंगणे कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस; ३ आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नांदगाव पेठ, अमरावती:

नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील ‘हिंगणे मसाला कंपनी’चे संचालक रजत अरुणपंत हिंगणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता ते ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील सुमारे ५९,००० रुपये किमतीच्या एकूण ०४ इलेक्ट्रिक मोटर चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी पोलीस ठाणे नांदगाव पेठ येथे अप क्र. ३०४/२०२६ कलम ३०५(१), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.



कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्याने तपास करत ४ ऑगस्ट २०२६ रोजी या गुन्ह्यातील ३ आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली व ५९,००० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

अटक करण्यात आलेले आरोपी:



  • आशीष गोपाळ रामटेके (वय ३५ वर्ष, व्यवसाय: सिक्युरिटी गार्ड, रा. ग्राम सावडी, ता. जि. अमरावती)

  • नितेश भीमराव गजभिये (वय २३ वर्ष, व्यवसाय: सिक्युरिटी गार्ड, रा. चिंचोली गवळी, ता. मोर्शी, जि. अमरावती; ह.मु. ग्राम सावडी, अमरावती)



  • मोहम्मद शकील मोहम्मद लाईक (वय ३३ वर्ष, व्यवसाय: भंगार विक्रेता, रा. यास्मीन नगर, झोपडपट्टी, अमरावती)

पोलीस पथकाची कामगिरी:



ही कारवाई पोलीस आयुक्त  नवनीत राणा  राकेश ओला साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१ श्री यशवंत सोळंके, सह. पोलीस उपायुक्त  नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात पो.उप.निरीक्षक गणेश राऊत, पोहेकॉ सतीश देशमुख, पोकॉ वैभव तिखिले, राजीव खान, शोएबुद्दीन सय्यद, निलेश साविकार आणि प्रफुल खोब्रागडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!