
“डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य”: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त वर्धा पोलिसांतर्फे सायबर जनजागृती ‘वाकथॉन’ संपन्न!

“डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य”: सरदार वल्लभभाई पटेल जयंती व सायबर जनजागृती निमित्त वर्धा पोलिसांतर्फे भव्य ‘वाकथॉन’ संपन्न!
पार्श्वभूमी व आयोजन:
-
देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि संपूर्ण ऑक्टोबर महिना ‘सायबर सुरक्षा महिना’ म्हणून पाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिसांच्या वतीने या भव्य वाकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
-
‘WALKATHON FOR A SAFER DIGITAL TOMORROW’ (डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य) या मथळ्याखाली ही वाकथॉन पार पडली.

-
पोलीस स्टेशन सायबरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीने ऑक्टोबर महिन्यातील सायबर जनजागृती मोहिमेचा यशस्वी समारोप केला.

२. वाकथॉनचा शुभारंभ व सहभाग:
-
पोलीस मुख्यालय, वर्धा येथून सकाळी ७.०० वाजता उत्साही वातावरणात या रॅलीची सुरुवात झाली.

-
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी या वाकथॉनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
-
“चला एकत्र करू डिजिटल भारत सुरक्षित” आणि “Walk, Learn, Stay Safe Together” असा संदेश देत या रॅलीमध्ये वर्धा पोलीस उपविभागातील मोठ्या संख्येने अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.


३. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या रॅलीमध्ये पोलीस दलातील खालील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते:
-
सौरभ कुमार अग्रवाल (पोलीस अधीक्षक, वर्धा)

-
सदाशिव वाघमारे (अपर पोलीस अधीक्षक)
-
प्रमोद मकेश्वर (पोलीस उपअधीक्षक, गृह)
-
सुनील महाडिक (उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा)
-
विनोद चौधरी (पो.नि. स्थागुशा)
-
चंद्रकांत पाटील (पो.नि., सायबर पोलीस स्टेशन)
-
श्रीमती पौर्णिमा राखूंडे (पो.नि., पो.स्टे. रामनगर)
-
याशिवाय वर्धा पोलीस दलातील विविध अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
४. नागरिकांसाठी संदेश व आवाहन:
-
वाकथॉनच्या माध्यमातून नागरिकांना सायबर हायजीन, मजबूत पासवर्डचा वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून सावधगिरी बाळगणे, ॲप्स आणि लिंक्स तपासून वापरणे तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत मोलाचा संदेश देण्यात आला.
-
महत्त्वाचे आवाहन: सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी कोणत्याही संकोचशिवाय तात्काळ १९३० (1930) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वर्धा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.



