
नवरात्रोत्सवात देवीच्या मंडपातून साऊंड सिस्टीम चोरी करणारे ३ चोरटे जेरबंद; ३ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला
पोलीस स्टेशन खदान हद्दीत नवरात्रोत्सवा दरम्यान देवीच्या मंडपातून साऊंड सिस्टीम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, खदान पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेले साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेला तीन चाकी ऑटो असा एकूण ३,४७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
पोलीस स्टेशन खदान येथे फिर्यादी विलास आत्माराम पोफळे (वय ४१ वर्षे, रा. गजानन वाटिका, मलकापूर, अकोला) यांनी तक्रार दिली होती की, दिनांक १३/१०/२०२६ रोजी रात्री २:५० वाजेच्या दरम्यान, पेंडॉलच्या मागील बाजूस ठेवलेली साऊंड सिस्टीम कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली.

चोरी गेलेल्या साहित्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होता:

-
न्यू मार्क एम-६ (New Mark M6) कंपनीचे डी.जे. मिक्सर
-
सुरज कंपनीचे क्रॉसर (Suraj Crosser)

-
एनएक्स ऑडिओ (NX Audio) कंपनीचे आरएक्स ४००० (Rx 4000) मशिन्स (०२ नग)
-
एक मोबाईल (किंमत अंदाजे २०,०००/- रुपये) असा एकूण १,३७,५००/- रुपये किमतीचा ऐवज आणि अँड्रॉइड मोबाईल चोरीस गेल्याने प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास आणि कारवाई:
गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस स्टेशन खदान येथील तपास पथकाने परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून गुन्हा क्र. १७५४/२०२६ कलम ३०३ (२) बी.एन.एस. अंतर्गत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला:
-
कृष्णा केशव इंगळे (वय २३ वर्षे, धंदा- ऑटो चालक, रा. क्रांतीनगर, शिवणी, अकोला)
-
मनोज उर्फ मनिष शिवचरण इंगळे (वय ४५ वर्षे, धंदा- चालक, रा. तानाजी नगर, सिंधी कॅम्प, अकोला)
-
गणेश दत्ता वाठोरे (वय २० वर्षे, धंदा- ऑटो चालक, रा. क्रांतीनगर, शिवणी, अकोला)
आरोपींकडून चोरी गेलेले साहित्य (New Mark M6 डी.जे. मिक्सर, Suraj Crosser, NX Audio Rx 4000 मशिन, जुना मोबाईल) आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन—काळी व पिवळ्या रंगाचा महिंद्रा TREO कंपनीचा ऑटो (क्र. MH30 BC 5399, किंमत अंदाजे २,९०,०००/- रुपये)—असा एकूण ३,४७,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मार्गदर्शन व पोलिस पथक:
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस स्टेशन खदानचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, सहा.पो.नि. राहुल जंजाळ, पो.हे.कॉ. निलेश खंडारे, पो.हे.कॉ. भूषण मोरे, पो.हे.कॉ. अभिम्यू सदाशिव, पो.कॉ. मंगेश खेडकर, पो.कॉ. शिवम दुबे, आणि पो.कॉ. वैभव कस्तुुरे यांनी ही यशस्वी कारवाई केली.



