
नागपुरात गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; ५३ चक्की नायलन मांजासह १९ वर्षीय तरुण अटकेत.

नागपुरात गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; प्रतिबंधित ५३ चक्की नायलन मांजा बाळगणारा तरुण अटकेत
नागपूर:

गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत, शासनाने प्रतिबंध केलेल्या नायलन मांजाची विक्री व साठा करणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून १ लाख ५९ हजार रुपयांचा मुदमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना नेमकी कशी घडली?

दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १४:१० ते १५:०० वाଜण्याच्या सुमारास, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील विजय अपार्टमेन्ट, फ्लॅट नं. ३०३, शंकर नगर चौक, अंबाझरी रोड, नागपूर येथे सापळा रचून धाड टाकण्यात आली.
या कारवाईदरम्यान एक इसम मिळून आला, ज्याने पंचसमक्ष आपले नाव अदीशराज वीरेंद्र झा (वय १९ वर्षे) असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या ताब्यातील फ्लॅटची पाहणी केली असता, तिथे शासनाने प्रतिबंध केलेला ‘मोनोकाईट’ लेबल असलेला ५३ चक्की नायलन मांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १,५९,०००/- रुपये किमतीचा नायलन मांजा जप्त केला आहे.

गुन्हा दाखल वपुढील तपास:
आरोपीचे कृत्य हे कलम २२३ भा.न्या.सं., सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६ अन्वये होत असल्याने त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस मुद्द्यामालाহ पुढील कारवाईसाठी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मार्गदर्शन:
सदरची उल्लेखनीय कामगिरी राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर), दीपक अग्रवाल (पोलीस उप आयुक्त, डिटेक्शन), आणि वैभव जाधव (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे) यांच्या मार्गदर्शनखाली, पोनि. दर्शन पाटील, सपनि. शिवाजी ननावरे व त्यांच्या पथकातील इतर अधिकारी आणि अंमलदारांनी पार पाडली.



