अंबाझरीत गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कारवाई; अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अंबाझरीतील अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; तिघांवर कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूर (प्रतिनिधी): शहरातील तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या अवैध हुक्का पार्लर्सविरुद्ध नागपूर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कडक पावले उचलली आहेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने अंबाझरी परिसरातील एका कॅफेवर धाड टाकून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १३,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, कॅफे मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? 



दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी आणि अंमलदार गस्तीवर असताना त्यांना अंबाझरी हद्दीत अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कॅम्पस चौक, अंबाझरी बायपास रोड येथील ‘जेन-झिस कॅफे’ (Zen-Zis Cafe) येथे पंचांसमक्ष छापा टाकला. तपासणीदरम्यान कॅफेमध्ये विनापरवाना आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य हुक्का पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात असल्याचे समोर आले.



कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे:



  1. पप्पू उर्फ राजू विकास डोंगरे (वय ३३, रा. प्लॉट नं. ९३९, रामनगर, तेलंगखेडी, अंबाझरी) – कॅफे मालक

  2. हर्ष विजय कंगाल (वय १९, रा. प्लॉट नं. ०३, हरिजन कॉलनी, जिंजर मॉलजवळ, जरीपटका) – कॅफे मॅनेजर



  3. नितीन बाळकृष्ण जाधव (वय ३५, रा. प्लॉट नं. १२१, बेझनबाग, जिंजर मॉल्समोर, जरीपटका) – ग्राहक/पुरवठादार

जप्त मुद्देमाल व कायदेशीर कारवाई:



या धाडीत पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट्स, विविध फ्लेवरचे तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण १३,८२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात ‘सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३’ (कोटपा) आणि ‘महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८’ च्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपासासाठी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या पथकाने पार पाडली कामगिरी:   

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविंचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे डिटेक्शन) दिपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट २ च्या महिला पोलीस निरीक्षक श्रीमती शुभांगी देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!