
एम.डी. पावडर बाळगणारे दोन जण अटकेत; नागपूर गुन्हे शाखेची ५ लाखांच्या मुद्यामालास सह धडक कारवाई!

नागपुरात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; एम.डी. पावडर बाळगणारे दोन जण अटकेत, ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!
नागपूर: गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपूर शहरात मोठी कारवाई करत एम.डी. (M.D.) पावडर बाळगणाऱ्या दोन आरापींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १३० ग्रॅम एम.डी. पावडरसह ५ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ०३:५० ते ०४:४० वाजण्याच्या दरम्यान गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत झेंडा चौक परिसरात पैदल पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी किल्ला महल, विकास शाळेमागे, सुरेश बागल यांच्या घरासमोर एक इसम आपल्या बर्ग्मन मोपेडच्या डिक्रीतून वस्तू काढून सोबतच्या इसमाला देत असताना संशयास्पद हालचालींमध्ये आढळला. पोलिसांना पाहताच दोन्ही इसम पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताबात घेतले.

आरोपींची नावे व ओळख:

पंचांसमक्ष विचारणा केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:

१. शेख मोहसीन अब्दुल गफूर (वय २८ वर्षे, रा. शिशु विकास शाळेमागे, पखवासा दवाखान्याजवळ, किल्ला महल, कोतवाली, नागपूर).
२. शेख शाकीब शेख (वय ३० वर्षे, रा. सैलानी जिम समोर, मेहंदी लॉन जवळ, तुलसीबाग, महाल, कोतवाली, नागपूर).

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
आरोपींच्या झडतीत त्यांच्याकडून खालील ऐवज जप्त करण्यात आला:

-
आरोपी क्र. १ च्या ताब्यात एका झिपलॉक पिशवीत ७० ग्रॅम वजनी एम.डी. पावडर.
-
आरोपी क्र. २ च्या ताब्यात एका झिपलॉक पिशवीत ६० ग्रॅम वजनी एम.डी. पावडर (एकूण १३० ग्रॅम).
-
२ मोबाईल फोन, बर्ग्मन मोपेड, छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि झिपलॉक पनी बंच.
-
एकूण जप्त केलेल्या मुद्यामालाची किंमत ५,१०,४००/- रुपये आहे.
तपासात मोठे उघडकीस:
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी सांगितले की, ही एम.डी. पावडर त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांकडून (ताब्यात घ्यायचे आरोपी – तरेज आलम ऊर्फ टिपू, रहील सलाम शेख, नौशाद इमरान मल्लीक, इरफान, आणि शेख इकराम शेख मुजफ्फर) आणून दिली होती. तसेच काही पावडर अमिन नावाच्या इसमाला दिली असून, काही पावडर शेख शाकीब याने स्वतः सेवनासाठी ठेवल्याचे सांगितले.
गुन्हा दाखल व पुढील कारवाई:
आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडरची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे हे कृत्य एन.डी.पी.एस. कायद्याच्या (N.D.P.S. Act) नुसार होत असल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे कोतवाली येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, इतर सहआरोपींचा शोध सुरू आहे.
मार्गदर्शन:
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नविचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. भारत क्षीरसागर, सपोनि. आनंद बिळेवार, पोहवा. इमरान शेख, ज्ञानेश्वर भोगे, विवेक अढाऊ व पोअं. संतोष शेंडे यांनी पार पाडली.



