बाप रे! मुलानेच केला वडिलांचा खून; आई जखमी

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे.

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिवनाथ काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सांगितले होते. मध्यरात्री लक्ष्मण गाढ झोपेत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने छाती आणि पोटावर वार केले.





पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची आई झोपेतून जागी झाली. शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. शिवनाथला अटक करण्यात आली.
मंजुळे यांची विवाहित मुलगी सध्या त्यांच्याकडे बाळंतपणासाठी आली आहे. सोमवारी रात्री सर्व जण झोपले असताना शिवनाथ याने घरातील कात्री घेऊन झोपलेल्या वडिलांच्या छातीत व पोटात खुपसली. त्यांच्या ओरडण्याने त्याच्या आईला जाग आली. तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, त्यात कात्री हाताला लागून त्याही जखमी झाल्या. लक्ष्मण मंजुळे यांना रुग्णालयात नेले़ परंतु, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!