गोमांस विक्री करणाऱ्यांवर नवेगाव बांध पोलिसांचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोमांस विक्री करणा-यावर नवेगावबांध पोलिसांचा छापा, तीन वेगवेगळ्या कार्यवाहीत २०० किलो गोमांस व साहीत्यासह ८ आरोपींना घेतले ताब्यात…

नवेगावबांध(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक २४/०३/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, दिनांक २५/०३/२०२४ रोजी होळीच्या सणाला गोमांस विक्री करीता ०३ वेगवेगळया ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यात येणार आहे.
सदर माहीती वरीष्ठांना देवुन महीला पोलिस निरीक्षक योगिता चाफले ठाणेदार पोस्टे नवेगावबांध यांचे मार्गदर्शनाखाली ०३ वेगवेगळे पथक तयार करुन मौजा नवेगावबांध येथील बिलाल कुरैशी, सुखदेव बलोदे, विनायक सोनवाने ग्राम मुंगली यांचे घरी सदर पथकाने छापा टाकला असता,
पहीली कारवाई मौजा नवेगावबांध येथील रा. आंबेडकर वार्ड येथे तीन ईसम हातात हत्यार घेवुन गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन दोन्ही जनावरांचे मुंडके अधर्वट कापुन व दोन्ही जनावरांचे पाय पुर्ण पणे शरीरापासुन कापुन वेगळे करुन दोन्ही चामडी अर्धवट सोलत असतांना तसेच गोमांश विक्रीकरीता तयार करतांना मिळुण आल्याने आरोपी नामे १)बिलाल अल्ताफ कुरैशी रा. नवेगावबांध, २) सुजित त्रिलोचंद्र तर्जुले, रा. नवेगावबांध ३) अब्दुल रज्जाक सुभान कुरैशी रा.संगमनगर नगापुर, यांचेकडुन ६० किलो गोवंश जातीच्या मास, डोके, पाय, ०१ नग सत्तुर, (काता), १ सुरी, कु-हाड असा एकुण ३२,५००/- रु चा माल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई मौजा नवेगावबांध येथील रा. आंबेडकर वार्ड मधील तीन ईसम हातात हत्यार घेवुन गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन मास कापत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे १) सुखदेव मोळा बलोदे, २) रविंद्र मारोती बलोदे सर्व राहणार नवेगावबांध यांचेकडुन ४० किलो गोमांस, ०१ नग सत्तुर (काता) १ सुरी, असा एकुण रु८२५०/- रु चा माल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई दरम्यान मौजा मुंगली येथे छापा टाकला असता सदर आरोपीतांना पोलिसांच्या कारवाईची चाहुल लागताच त्याने टाटा एस या चार चाकी वाहन क्रमांक एम एच ३५ के ४०२७ मध्ये जनावरांचे मांस भरुन पळुन जात असतांना चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता, वाहनचालकाने वाहन न थांबविल्याने सदर वाहनाचा पोनि योगीता चाफले,पोउपनि भोसले  पोशि पवार,निर्वाण यांनी पाठलाग करुन सदर वाहन थांबविले वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) विनायक घुसा सोनवाने व २) मुकेशवर विनायक सोनवाने दोन्ही रा. मुंगली असे सांगितल्यावरुन पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता मागील त्यात प्लास्टीक पिशवीत  गोवंश जातीच्या
जनावरांचे कापलेले मास व जनावरे कापण्याचे साहीत्य मिळुण आले. त्यांचेकडुन ८० किलो गोवंश जातीचा मांस, मांस
कापण्याचे साहीत्य व १ टाटा एस माल वाहक असा एकुण १,५०,०००/- रु. चा माल जप्त करण्यात आला.





सदरच्या  तिन्ही कार्यवाह्या ह्या ही दिनांक २५/०३/२०२४ च्या पहाटे करण्यात आलेल्या आहेत कारवाई दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी,देवरी यांनी घटनास्थळाला भेट देवुन पुढील कारवाई बाबत मार्गदर्शन केले. वरील तिन्ही कारवाईमध्ये एकुण ०८ आरोपींवर भारतीय दंड संहीता व महाराष्ट्र पशु अधिनियम १९६० अंतर्गत वेगवेगळया कलमान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोउपनि दुनेदार,सफौ अनंतराम तुलावी, नापोशि गौरीशंकर कोरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे,अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद गोंदिया कॅम्प देवरी,उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी  विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन नवेगावबांध येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक योगीता चाफले,पोउपनि अमोल भोसले,पोहवा इंदुरकर,राऊत, चापोहवा शेख, मपोहवा नंदेश्वर, मपोना राऊत पोशि पवार निकुरे,निर्वाण पोस्टे नवेगावबांध यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!