
पिस्टल-जिवंत काडतुसे बाळगणारा मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात…
पिस्टल-जिवंत काडतुसे बाळगणारा मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात…
ठाणे (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुक प्रकिया ही कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी या करिता ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र, अग्नीशरवे दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त पोलिस सह आयुक्त ठाणे शहर व अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर यांनी वेळोवेळी आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस उप आयुक्त परिमंडळ-१, सहाय्यक पोलिस आयुक्त, कळवा विभाग, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली अवैद्यरित्या अग्नीशरवे व दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, मुंब्रा पोलिस स्टेशन, ठाणे यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.



सदर आदेशाची अंमलबजावणी करत असताना (दि.०५मे) रोजी मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंब्रा रेतीबंदर परिसरात एक इसम मोठ्या प्रमाणावर अवैध अग्नीशस्त्र, काडतुसे गावठी पिस्टल घेऊन विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली.

सदर बातमीचे अनुषंगाने वपोनि अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अजय कुंभार मुंब्रा पोलिस स्टेशन, ठाणे शहर यांनी व त्यांच्या पथकाने, रेतीबंदर कडुन मुंब्राकडे जाणारे रोड, संजु म्हेत्रे यांचे अपंग स्टॉल जवळ मुंब्रा, ठाणे येथे सापळा रचला असता इसम नामे उत्तम पितांबर पुनिया, (वय-२३ वर्षे), रा.धनीरवास, ता.सलहवास, जिल्हा झज्जर राज्य-हरियाणा, हा अवैदयरित्या अग्नीशस्त्रासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचे जवळील एका बॅगमध्ये ०२ देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व सोबत ०३ जिवंत राउंड मिळुन आले. सदरचे देशी बनावटीचे दोन अग्नीशस्व व तीन जिवंत काडतुसे असा १,११,५००/- रू कि. सु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे. आरोपीत हा पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेला मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळुन आल्याने त्याचेविरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे गु.र.नं.१२७०/२०२३ भा.ह.का.क. ३.२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)/१३५ प्रमाणे (दि.०५मे) रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान नमुद आरोपीस (दि.०५मे) रोजी अटक करण्यात आलेली असुन, न्यायालयाने त्यास ८ मे पर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली आहे.

अशा प्रकारे सदर कारवाई ही आशुतोष डुंबरे पोलिस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलिस आयुक्त, ठाणे शहर, विनायक देशमुख अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, सुभाषचंद्र बुरसे पोलिस उप आयुक्त, परि-१ ठाणे, उत्तम कोळेकर सहाय्यक पोलिस आयुक्त, कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय दवणे, सपोनि अजय कुंभार, पोहवा. महाले, पोना. काटकर, पोशि. रोशन कदम, पोशि. विरकर, पोशि. जाधव, यांनी केलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि अजय कुंभार हे करीत आहेत.



