
अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले ८ दुचाकी चोरीचे गुन्हे…
अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उघड केले तब्बल ८ दुचाकी चोरीचे गुन्हे,९ दुचाकी केल्या हस्तगत…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(४) मे रोजी सकाळी १०.३० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत राजाबाक्षा हनुमान मंदीर जवळ, नागपूर येथे फिर्यादी दिनेश महादेव तिजारे वय ३६ वर्ष रा. प्लॉट नं. ४७, इंदिरा नगर, ईमामवाडा, नागपूर यांनी त्यांची अॅक्टीव्हा ३ जी गाडी क्र. एम. एच ३१ ई.बी ४९३३ किंमती २०,००० /- रू ची
लॉक करून गेले असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी पोलिस ठाणे ईमामवाडा येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.


गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे ईमामवाडा येथील तपास पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सदरची दुचाकी ही मोहीत विनोद मेश्राम वय २५ रा. रामबाग बडवाईक बिल्डींगच्या मागे ,ईमामवाडा नागपुर याने केल्याचे निष्पन्न झाले यावरुन त्यास सापळा रचुन ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने वर नमुद वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीतुन २) पुन्हा एक अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४९ ए.जी ००८६ किंमत १५,००० /- रू ३)पोलिस ठाणे अजनी हद्दीतून हिरो स्प्लेंडर गाडी क्र. एम.एच ४९ बि.एल ०४४१ किंमत ५०,००० /- रू ४) पोलिस ठाणे कोतवाली हद्दीतुन अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच डि.टी ४७१७ किंमत ३०,००० /- रू, ५) पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतुन अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४९ ए ९८९० किंमती ३०,००० /- रू, ६)पोलिस ठाणे गणेशपेठ हद्दीतुन अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४९ ए.एक्स २८८० किंमत ३०,००० /- रू ७)पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीतुन अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४९ बि.एच ०९९८ किंमत ३०,००० /- रू ८) पोलिस ठाणे पाचपावली हद्दीतुन अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच ४९ ए. एफ ७१४८ किं ५०,००० /- रू चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन वरील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

आरोपीचे ताब्यातुन पुन्हा एक अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच ४९ एक्स ३७८४ किंमती ३०,०००/- रू जप्त करण्यात आलेली आहे.आरोपीचे ताब्यातुन एकुण ०९ चोरी केलेली वाहने एकुण किंमती २,८०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पोलिस ठाणे ईमामवाडा येथील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग) शिवाजीराव राठोड,पोलिस उपायुक्त (परि क्र. ४)विजयकांत सागर,सहायक पोलिस आयुक्त (सक्करदरा विभाग)हेमंत शिंदे
यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन ईमामवाडा चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सपोनि. गणेश पवार, पोहवा. रविन्द्र राऊत, संदीप बोरसरे, गणेश घुघूलकर, भगवती ठाकुर, विरेन्द्र गुडरांधे, अमीत पात्रे, नापोशि सुशील रेवतकर, पोशि देवेन्द्र भोंडे, रणजीत सक्करवार यांनी केली.


