
अट्टल सोनसाखळी चोरट्यास अकोला गुन्हे शाखेने सातारा येथुन घेतले ताब्यात,१९गुन्हे केले उघड…
कुख्यात सोनसाखळी चोरट्यास सातारा जिल्हयातुन स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गेल्या १५ दिवसात अकोला शहरातील ०३ चैन स्नॅचींग (सोन साखळी हिसकावने) गुन्हे आणले उघडकिस…
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१९) ॲागस्ट २०२३ रोजी शास्त्री नगर, सिव्हील लाईन अकोला येथे महिलेचे सोन साखळी हिसकयुन ०२ अज्ञात दुचाकी वरून फरार झाले होते त्याबाबत पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप क्र. ४२९/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्याचप्रमाणे दि(२२) ॲागस्ट २०२४ रोजी सुध्दा पोलिस स्टेशन सिव्हील लाईन उमरी परिसरात ०२ अज्ञात दुचाकी स्वारांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावुन फरार झाले होते. लगेच १ तासाचे अंतराने मानव शोरूम समोर पो.स्टे. जुने शहर हद्दीत त्याच ०२ अज्ञान दुचाकी स्वारांनी महिलेच्या गळयातील सोन साखळी हिसकावुन वाशिम बायपास व्या दिशेने फरार झाले होते. त्याबाबतसुध्दा पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप क. ४३७/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. व पो. स्टे. जुने शहर येथे अप क. ४६४/२०२४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे एकाच दिवशी दाखल करण्यात आले होते


दि २२/०८/२०२४ रोजी काळा मारोती मंदीर जवळ, राम नगर अकोला येथे एका वृध्द महिलेची सोन साखळी दोन इसमांनी हिसकावुन घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी स्था.गु.शा. प्रमुख पो.नि. शंकर शेळके यांना दिली असता त्यांनी स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देवुन पिडीत वृध्द महिलेच्या घरी भेट देऊन गुन्हयाबाबत माहिती घेवुन सि.सि.टी. व्ही. फुटेज प्राप्त करून तपासाला गती दिली होती.

त्याअनुषंगाने राज्य स्तरावरील गोपनिय माहितीगार व तांत्रीक माहितीचा आधारे यातील संशयीत आरोपी सादिक अली इबाबत अली इराणी, वय २० वर्ष, रा. पापा नगर, रजा टॉवर जवळ, भुसावळ, जि. जळगाव यास निष्पन्न करुन तो लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने दिनांक २४/०८/२०२४ रोजी तात्काळ पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांचे आदेशाने स्था.गु.शा. अकोला चे एक पथक आरोपीस अटक करण्यासाठी सातारा येथे रवाना झाले होते.त्यानुसार दिनांक २५/०८/२०२४ रोजी स्था.गु.शा. अकोला पथकाने लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथे पोहचुन तांत्रीक माहिती व स्थानिक खबरीच्या मदतीने आरोपी भाडयाने राहत असलेल्या फलटण रोड, लोणंद येथील घरून शिताफिने ताब्यात घेवुन त्यास अटक केली. व त्याचा साथीदार हा मोटर सायकल सह फरार असुन त्यास लवकरच अटक करण्यात येईल.

सदर अटक आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली असता त्याचेवर एकंदर गंभीर स्वरूपाचे (चैन स्नॅचींग) भुसावळ जि. जळगाव येथे एकुण ०६ गुन्हे, जळगाव शहर येथे ०२ गुन्हे, हर्सुल मध्यप्रदेश, वाकड पिंपरी चिंचवड, जामनेर जि. जळगाव, रत्नागिरी, कोथरूड जि. पुणे, खामगाव जि. बुलढाणा, पंतनगर मुबंई, कोतवाली अहमदनगर येथे प्रत्येकी ०१ गुन्हा असे एकुण १९ गुन्हे दाखल असुन अकोला जिल्हयात ०३ गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.तसेच आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पो.स्टे. सिव्हील लाईन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा येथील स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो. अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, भिमराव दिपके, प्रशांत कमलाकर, राहुल गायकवाड, सायबर शाखेचे पो. अं. गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.


