
रेकॅार्डवरील गुन्हेगारास ४ पिस्टल व ३ काडतुसह सांगवी पोलिसांनी घेतले ताब्यात…
सांगवी गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी रेकॅार्डवरील आरोपीचे ताब्यातुन ०४ पिस्टल व ०७ जिवंत काडतुस केल्या जप्त…..
सांगवी(पिंपरी-चिंचवड)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी सांगवी पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अंमलदार पोलिस हवा. विवेक गायकवाड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,जुनी सांगवी, पुणे येथे वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर एक निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व काळी रंगाची हुडी घातलेला अंदाजे २२ ते २५ वयोगटातील एक इसम थांबला असुन त्याने कमरेला पिस्तुल लावलेले आहे


अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगवी पोलिस स्टेशन यांना देण्यात आली. त्यांनी सदर इसमास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सांगवी पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पोलिस उप निरीक्षक चक्रघर ताकभाते यांनी पथक तयार करुन सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रोहित दुर्गेश धर्माधिकारी, वय २३ वर्ष, रा. कान्हु शितोळे चाळ, प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी, पुणे असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस मिळुन आले.

सदर इसमाविरोधात पोलिसांनी सांगवी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ०८/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याचेकडे मिळुन आलेले ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस जप्त केले. सदर गुन्हयाचा तपास पो.उ.नि. ताकभाते हे करीत आहे. सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी त्याचेकडुन आणखी ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुस जप्त केले. अशा रितीने पोलिसांनी आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी याचेकडुन एकुण ०४ देशी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत काडतुस जप्त केले आहेत. सदर आरोपीवर यापुर्वी अवैध अग्निशस्त्र बाळगणे बाबत गुन्हा नोंद आहे. सदर पिस्टल कोणत्या कारणासाठी आणले होते याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १ स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोउपनि चक्रधर ताकभाते, श्रेणी पो.उ.नि. सुरेश हिंगे, सफौ. शशीकांत वाघुले, पो.हवा. प्रकाश शिंदे, सचिन ढवळे, विवेक गायकवाड, प्रमोद गोडे, प्रविण पाटील व पो.शि. सुहास डंगारे यांनी केली.


