
सराईत गुन्हेगाराकडुन स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ८ किलो गांजा…
सराईत गांजा विक्री करणार्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ८ किलो ७७५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फतीने वर्धा जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे व सेवन करणारे लोकांची माहीती काढून त्यांचेवर शिताफीने सापळा रचून कठोर कारवाई करण्याचे आदेशीत करण्यात आले होते


त्याअनुषंगाने दि. १ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पथक पोलिस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंदयांवर कारवाई करीता गोपनिय माहीती काढीत असता त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, हिंगणघाट शहर परीसरात गांजा विकी करणारा सराईत आरोपी शाहरूख सरदार खान पठाण याने मोठया प्रमाणात गांजा अंमली पदार्थ आणलेला असून त्याचा चुलत भाऊ जुबेर गुलजार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचे घरी ठेवलेला आहे.

अशा खात्रीशीर माहीतीवरून जुबेर गुलजार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचे घरी गांजा अंमली पदार्थाबाबत छापा घातला असता त्याचे घरझडतीत शाहरूख सरदारखान पठाण याने आणून ठेवलेल्या ट्रॅव्हलर बॅग मध्ये भरून असलेला गांजा अंमली पदार्थ वजन ८ किलो ७७५ ग्रॅम एकुण १,७५,५००/- रू. चा मुद्देमाल अवैधरीत्या मिळून आल्याने आरोपी जुबेर गुलजार खॉन पठाण याचे कडून जप्त करण्यात आला. आरोपी जुबेर गुलजार खॉन पठाण यास त्याचे घरझडतीतुन मिळालेल्या ‘गांजा’ हा अंमली पदार्थ त्याने कोणा कडून आणला? या बाबत चौकशी केली असता शाहरूख सरदार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट हा गांजा विक्री करतो. त्यानेच दोन दिवसापुर्वी घरी गांजा भरून असलेली बॅग आणून ठेवलेली असून सध्या तो त्याचे घरी नाही असे सांगीतले. यावरून आरोपी १) जुबेर गुलजार खान पठाण, वय ३५ वर्षे, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट, २) शाहरूख सरदार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट यांचेविरूध्द पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे एन. डि. पि. एस. अॅक्ट चे विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा. सागर रतनकुमार कवडे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि सलाम कुरेशी, अमोल लगड, पोलिस अंमलदार हमीद शेख, राजेश तिवस्कर, गजानन लामसे, मंगेश आदे, दिपक साठे, मुकेश ढोके, अखिल इंगळे रितेश गेटमे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


