अमानुषपणे मारहान व क्रुरपणे खुन करुन प्रेताची विल्हेवाट अशा गुढ खुनाचा देवळी पोलिसांनी केला १० दिवसाचे आत उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

देवळी पोलिसांनी अतिशय रहस्यमयरित्या क्रुर खुनाच्या गुन्हयाचा दहा दिवसात केला उलघडा, ३ आरोपी ताब्यात ४ फरार आरोपींचा शोध सुरु….

देवळी(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 10. मे 2025 रोजी पोलिस स्टेशन पुलगांव येथे इसम गोपाल उर्फ गोलु धनराज कुंभरे, रा. लांबा ता. देवळी जि वर्धा याची मिसिंग क्र 30/2025 अन्वये दाखल करण्यात आली होती.त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन देवळी तपास करीत असतांना दि 10.मे 2025 रोजी पोलिस स्टेशन देवळी अंतर्गत असलेल्या  खर्जा धरणात एक अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले, यावरुन सदर प्रेताची ओळख पटविण्या करीता आजुबाजुच्या गावात चौकशी केली असता मृतका चे नातेवाईकांनी प्रेताची ओळख पटवून . त्याचे नाव गोपाल उर्फ गोलु धनराज कुंभरे असल्याचे निष्पन्न झाले.





त्यानुसार पोलिस स्टेशन देवळी येथे मर्ग क्र 30/2025 कलग 194 भा.ना.सु.सं. अन्वये दाखल करून बौकशी करण्यात आली. सदर  मर्ग चौकशीअंती पोलिसांना असे लक्षात आले की  मार्च महीण्यामधे म्रुतक याने  अनुप उर्फ गुड्डु दाबेकर याचेकडुन त्याचे मित्राची मोटर सायकल गहाण ठेवून पैसे उसणे घेतले होते. सदरची मोटर सायकल चोरीची असल्याने पोलिस स्टेशन सावंगी यांनी ती  हस्तगत केली होती यावरुन अनुप उर्फ गुड्डु दाबेकर याला मृतकाने चोरीची मोटर सायकल देऊन फसविल्याचा राग त्याचे मनात होता.



त्यानुसार दि 07.मे .2025 रोजी अनुप उर्फ गुड्डु दाबेकर हा मृतक याला तांबा येथुन कोला येथे घेवुन गेला आणि त्याचे इतर 06 साथीदारांसह मिळुन मृतकाला काठी व बेल्टने उघडे करून बेदम मारहाण केली. सदर मारहाणीत मृतक याचा मृत्यु झाल्याची खात्री झाल्यावर त्याचे प्रेत त्यांनी रात्रीच्या वेळी खर्डा धरणात फेकुन दिले यावरुन .पोलिस स्टेशन देवळी येथे अपराध क्र  386/2025 कलम 103 (1), 140 (1), 189 (2), 189 (4), 190, 191 (3), 238 भा.न्या.सं.अन्वये अपहरन व हत्येचा वाढीव कलमानुसार  नोंद करुन सदर गुन्ह्यातील आरोपी १) अविनाश भोयर, रा. कोता वेणी, ता. कळंब, जि. यवतमाळ २)  धनराज उर्फ धन्नु कोल्हे, रा. कोठा वेणी, ता. कळंब, जि. यवतमाळ ३) शुभम टेकाम, रा. तांबा, ता. देवळी, जि. वर्धा यांना अटक करण्यात आली असुन यातील उर्वरीत मुख्य आरोपी ४)अनुप उर्फ गुड्डू दाबेकर, रा. कोठा वेणी, त्ता. कळंब, जि. यवतमाळ ५) अनिकेत काकडे, रा. कोठा वेणी, ता. कळंब, जि. यवतमाळ ६) सुरचा बांडमुचे, रा. कोता वेणी, ता. कळंब, जि. यवतमाळ ७)  विजय येळाने, रा. कोठा वेणी, ता. कळंब, जि. यवतमाळ हे फरार असुन त्यांचा शोध पोलिस स्टेशन देवळी येथील तपास पथक करीत आहे



सदरची कामगिरी ही पोलिस अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार जैन,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी, पुलगाव राहुल चव्हान यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविन्द्र शिंदे, ठाणेदार पोलिस स्टेशन देवळी,पोउपनि  कल्पेश मगरे, सफौ दिपक जाधव,,पोहवा मनोज कांबळे, कुणाल हिवसे, नितीन तोडासे, पोशि संदीप बोरबन,  पोशि रामदास दराडे, पोशि उमेश बेले यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!