वाशिम गुन्हे शाखेची अशीही तत्परता नवी मुंबई येथुन अपहरण झालेल्या ईसमास १२ तासाचे आत घेतला शोध….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नवी मुंबई येथुन किडनॅप केलेल्या ईसमाचा तत्परतेने शोध घेवुन नवी मुंबई पोलीसांचे ताब्यात देऊन  सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन घेतले ताब्यात…..

वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,APMC .पोलिस स्टेशन, मुंबई चे सपोनि. प्रभाकर शिऊरकर यांचा दि.१९ मे २०२५ चे रात्री २.०० वा. फोन आला की मुंबई येथुन पंकेश संजय पाटील वय २८ रा. वरद, नवी मुंबई यांचे अपहरण झाले आहे यावरुन पोलिस स्टेशन APMC .येथे अप.नं.२९७/२०२५ कलम १४०(१), १२६(२), १४२, १३५, ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.





त्यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील अपहरणकर्ता आरोपी ऋुषीकेष काळे रा काटा कोंढाळा वाशिम  व त्यांचे राहण्याचे ठिकाणांचा १२ तासाचे आत शोध घेवुन सदर आरोपींस त्याचे एका साथीदारासह ताब्यात घेतले. सदर आरोपींने मुंबई येथुन किडनॅप केलेल्या इसमाची माहिती घेतली असता, त्यास केनवड शेतशिवारातील एका टिनाचे शेड मध्ये हातपाय बांधुन ठेवले असल्याचे कबुली दिली. तात्काळ केनवड येथील शेतशिवारात पोहचुन आरोपीची सुटका केली. आरोपी व किडनॅप केलल्या इसम पंकेश संजय पाटील तसेच गुन्हयात वापरलेल्या स्विफ्ट डिझायर गाडी व मोबाईलसह मुंबई पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.



सदर कामगिरी ही पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती लता फड,सहा. पोलिस अधीक्षक, नवदिप अग्रवाल, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सपोनि. योगेश धोत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद सुर्वे, प्रशांत राजगुरु, संतोष कंकाळ, ज्ञानदेव म्हात्रे, दिपक घुगे, विठ्ठल महाले, अमोल इरतकर, संतोष वाघ, सुनिल तायडे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!