
अमरावती: हातात तलवार घेऊन दहशत पसरवणारा गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
अमरावती शहरात धारदार शस्त्रासह लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमरावती शहर गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
लोकांमध्ये दहशत पसरवणारा गुन्हेगार अटकेत अमरावती शहर गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इतवारा बाजार परिसरात एक इसम अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घालून, हातात शस्त्र घेऊन आरडाओरड करत लोकांमध्ये दहशत पसरवत आहे. सदर धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त शाम घुगे पोलीस उपआयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त कैलास फुंडकर आणि सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शस्त्रे आणि वाहनासह ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ इतवारा बाजार येथे जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी नमूद वर्णनाचा इसम हातात लोखंडी छोटी तलवार घेऊन फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील ५०० रुपये किमतीची तलवार जप्त केली. तसेच, त्याच्या ताब्यातील होंडा शाईन गाडीची झडती घेतली असता, सीटखाली आणखी एक ५०० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा धारदार चाकू मिळून आला.
पोलिसांनी आरोपीकडून ७०,००० रुपये किमतीची दुचाकी आणि शस्त्रे असा एकूण ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील कारवाईसाठी आरोपीला कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

आरोपीचे नाव:
-
अशोक मेहताबसिंग पाल (वय २३ वर्षे, रा. बालाजी प्लॉट, अमरावती).

जप्त केलेला मुद्देमाल:
१) होंडा शाईन दुचाकी (क्र. MH27 DG-8117) – किंमत अंदाजे ७०,००० रुपये.

२) एक काळ्या रंगाचा धारदार चाकू – किंमत अंदाजे ५०० रुपये.
३) एक लोखंडी छोटी धारदार तलवार – किंमत अंदाजे ५०० रुपये.
कारवाई करणारे पोलीस पथक:
या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोउपनि फिरोज खान, पोहवा संभाजी केन्द्रे, मंगेश लोखंडे, नाझीमउददीन सैयद, सचिन भोयर, पोलीस अमलदार रंजित गावंडे, नरेश मोहरिल, सुरज चव्हाण, निखील गेडाम आणि चालक चेतन शर्मा (गुन्हे शाखा, अमरावती शहर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




