अमरावती ग्रामीण: भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर पोलिसांची धाड, दोन जण अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्यांवर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त.

अमरावती:-





‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत मोठी कारवाई: अमरावती ग्रामीण जिल्ह्यात पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष ‘ऑपरेशन कवच’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर आणि जुगार अड्ड्यांवर प्रभावी व कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



  • गोपनीय माहिती आणि छापा: याच अनुषंगाने, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दर्यापूर जवळील कच्छीपुरा (बनोसा) येथे राहणारा एक तरुण भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर आपल्या घराच्या माळ्यावर बसून अवैध सट्टा चालवत आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित घराची झडती घेत छापा टाकला.



  • सड्ड्याची हाय-टेक पद्धत: छापा टाकला असता, मुख्य आरोपी शहबाज सलीम घानीवाले हा लॅपटॉप आणि दोन मोबाईलच्या साहाय्याने ‘जय श्री राम’ नावाच्या सट्टा ॲपद्वारे ग्राहकांना लिंक पाठवत असल्याचे निष्पन्न झाले. तो मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून ग्राहकांच्या सतत संपर्कात राहून क्रिकेट सामन्याचे आकडे व दर उपलब्ध करून देत सट्टा (जुगार) खेळवत होता.

  • अटक करण्यात आलेले आरोपी: १. शहबाज सलीम घानीवाले (वय २८ वर्षे, रा. कच्छीपुरा, बनोसा, दर्यापूर, जि. अमरावती) – हा स्वतःच्या घरातून लॅपटॉप व मोबाईलच्या सहाय्याने प्रत्यक्ष सट्टा चालवत असताना रंगेहात पकडला गेला. २. नितीन बबनराव ठाकरे (वय ४० वर्षे, रा. मंगरूळपीर, जि. वाशिम) – मुख्य आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याला सदर ‘जय श्री राम’ सट्टा ॲप आणि त्याची लिंक मंगरूळपीर येथील नितीन ठाकरे याने पुरविल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा साथीदार असलेल्या नितीन ठाकरे यास मंगरूळपीर येथून अटक केली.



  • जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून क्रिकेट स्र्ट्यासाठी वापरलेला ASUS कंपनीचा लॅपटॉप, OPPO व APPLE कंपनीचे दोन मोबाईल फोन तसेच इतर सट्टा साहित्य असा एकूण ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • गुन्हा नोंद व कायदेशीर कारवाई: या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे सहभाग आहे का, या दिशेने पुढील तपास सुरू आहे.



  • कारवाई करणारे पोलीस पथक: ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, दिनेश कनोजिया, सागर नाठे, युवराज सोळंके आणि वाहन चालक प्रशिक वानखडे यांच्या पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!