बल्लारपूर: ५० हजारांची पल्सर २२० हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपूर / बल्लारपूर:

पोलीस स्टेशन बल्लारपूरच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीची चोरीची बजाज पल्सर २२० मोटारसायकल जप्त करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.



बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने आपली ‘बजाज पल्सर २२०’ ही मोटारसायकल दिनांक २० जुलै २०२६ रोजी बॅटरी टाकण्यासाठी एका गॅरेजवर दिली होती. त्यानंतर गॅरेजवर गाडी परत आणण्यासाठी गेले असता गाडी त्या ठिकाणी मिळून आली नाही. या प्रकरणी तक्रारदाराने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे मोटारसायकल चोरीची तक्रार नोंदवली होती.

दिनांक २७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बल्लारपूर येथील दूध डेअरी परिसरात एक इसम बल्लारपूर येथून चोरीला गेलेली बजाज पल्सर २२० गाडी विकण्यासाठी चौकशी करत आहे.



माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने दूध डेअरी परिसरात त्वरित सापळा रचला. कारवाई दरम्यान एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरी झालेली ₹५०,००० किमतीची बजाज पल्सर २२० मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

सदर यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:



  • मार्गदर्शन

    •  पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी



       अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे

    • नेतृत्व:

      • पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर)

    • तपास पथक:

      • सपोनी बलराम झाडोकार

      • पोउपनी सर्वेश बेलसरे

      • पो.हवा. सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुट्टावार

      • पो.अं. प्रतीक हमके, विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पुलवार, दिनेश अराडे (सर्व रा. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर)







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!