चिल्ड्रेन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारी टोळी LCB कडून उद्ध्वस्त; दोघांना अटक!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चिल्ड्रेन बँकेच्या नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखची मोठी कारवाई

बुलढाणा (दि. २७ जुलै २०२६): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लोकांना कमी रक्कमेच्या मोबदल्यात जास्त रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, ‘चिल्ड्रेन बँक’ लिहिलेल्या १०,००,०००/- रुपये दर्शनी किंमतीच्या बनावट नोटांसह एकूण २,४५,१०ळ/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील तक्रारदार श्री. सुभाष माणिकराव गावंडे यांना १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून काही इसम मलकापूर शहर परिसरात फसवणूक करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.



या माहितीच्या आधारे स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक  आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली पथकाने २६ जुलै २०२६ रोजी मलकापूर शहरातील नॅशनल हायवे क्रमांक ०६, कुंड (मलकापूर) येथे सापळा रचून कारवाई केली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. अभिषेक भिमराव इंगळे (वय २० वर्षे, रा. कुन्हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)



२. मयुर सुनिल खानझोडे (वय १९ वर्षे, रा. कुन्हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)

 या प्रकरणातील घटनास्थळावरून पळून गेलेल्या इतर ०६ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.



जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹२,४५,१००/-):

  • नगदी रक्कम: ₹५,०००/-

  • चिल्ड्रेन बँक लिहिलेल्या नोटा: १०,००,०००/- रु. दर्शनी किंमतीच्या (किंमत ००/- रु.)



  • धारदार चाकू: १ नग (किंमत ₹१००/-)

  • मोबाईल फोन: ४ नग (किंमत ₹१,२०,०००/-)

  • मोबाईल/मोटारसायकल: स्प्लेंडर प्लस (किंमत ₹७०,०००/-)

गुन्हा दाखल व पुढील कारवाई:

तक्रारदार सुभाष माणिकराव गावंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. ५५३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२) सहकलम १३५ म.पो. कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.

पोलीस पथक व मार्गदर्शन:

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव  पियूष जगताप, आणि अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा  अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी पथक: पोनि. आशिष रोही, पोउपनि. अविनाश जायभाये, प्रशांत डगवार, ASI राजेंद्र अंभोरे, पोहेकॉ. गजानन दराडे, गणेश पाटील, अनुपकुमार मेहेर, विजय पैठणे, राकेश नायडू, पोकॉ. गजानन गोरले, अमोल वानेरे, मनोज खरडे, व सतीश नाटेकर (सर्व रा. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा).







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!