
उमरेड पोलिसांची धडक कारवाई: बनावट नोटा, वन्यजीव अवयव व अमली पदार्थांसह टोळी गजाआड; ७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
उमरेड पोलिसांनी धडक कारवाई करत बनावट नोटा तयार करून फसवणूक करणाऱ्या, तसेच वन्यजीवांचे अवयव आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ५ जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹७,९०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटना आणि पोलिसांची कारवाई

-
गोपनीय माहिती व सापळा: दिनांक २६/०८/२०२६ रोजी उमरेड शहरातील घटाळी रोड परिसरात काही इसम बनावट नोटा बाळगून त्यांची विक्री करणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली.
-
वाहनाची तपासणी: घटाळी रोडकडून उमरेडकडे येणाऱ्या संशयित मारुती स्विफ्ट कार (क्रमांक HR 06 AV 6549) ची पंचसमक्ष झडती घेतली असता, कारमधील आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल
-
नोटा व साहित्य: ₹१०० च्या ६ बंडल नोटा (एकूण ₹६०,०००/-), ₹१० च्या ९९ नोटा (₹९९०/-), कागद, काच, मशीन/लॉकर, केमिकलच्या बाटल्या व इतर साहित्य.

-
वन्यजीवांचे अवयव: काळवीटाचे १ शिंग, हरणाचे १ शिंग आणि वाघाचे दात यांसारख्या वन्यजीवांच्या अवयवांसदृश्य वस्तू.
-
अंमली पदार्थ: धातूच्या डबीत काळसर-चॉकलेट रंगाचा ४.३४ ग्रॅम वजनाचा, ₹२१,७००/- किमतीचा अफीम सदृश अंमली पदार्थ.

-
एकूण जप्ती: वाहन, रोकड आणि अंमली पदार्थांसह एकूण ₹७,९०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोडस ऑपरेंडी (फसवणुकीची पद्धत)
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नागरिकांना कमी रक्कम दिल्यास त्याच्या मोबदल्यात जास्त रकमेच्या बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवत असत. त्यांच्याजवळील मशीन, केमिकल व इतर साहित्य दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर प्रत्यक्ष बनावट नोटा न देता लोकांचे पैसे घेऊन पोबारा करत असत.
आरोपींची नावे
१. कुलदीप धनुराम कश्यप (वय ३६ वर्षे, रा. कर्नाल, हरियाणा)
२. मोहित नरेश कश्यप (वय २६ वर्षे, रा. पानिपत, हरियाणा)
३. गौरव राधेश्याम कश्यप (वय २५ वर्षे, रा. पानिपत, हरियाणा)
४. एक महिला आरोपी
५. अक्षय वसंतराव पाटील (रा. उमरेड – तपासात निष्पन्न झालेला स्थानिक सहभागी आरोपी)
दाखल गुन्हे
सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता) सह वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि NDPS कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी .हर्ष ए. पोद्दार (वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण),अनिल म्हस्के (अपर पोलीस अधीक्षक), मयंक माधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक व उमरेड पोलीस पथकाने केली आहे.




