अमरावती: वृद्ध सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैसे लुटणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अमरावती: फुलबासा, मंगलधाम कॉलनी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेणाऱ्या आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. श्रवण राजेश बनारसे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त  यशवंत सोळंके ,पोलीस उपआयुक्त  प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त […]

Read More

पथ्रोट पोलिसांची मोठी कारवाई: देशी कट्ट्यासह एका युवकाला अटक, दुसरा आरोपी फरार

अमरावती: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून शस्त्रांसह फोटो व व्हिडिओ व्हायरल करून भाईगिरी व दहशत निर्माण करणाऱ्यांवर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अमरावती ग्रामीणमधील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका २४ वर्षीय युवकाला देशी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन […]

Read More

मुख्य बातमी: खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना राजापेठ पोलिसांकडून अटक

अमरावती (दि. १० जुलै २०२६): अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानखेडा बु. येथील एका गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. २ जुलै २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा  दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश मुंढे करत […]

Read More

चंद्रपुरात आंतरराज्यीय सराईत घरफोड्या जेरबंद; ९ गुन्हे उघड, ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या आंतरराज्यीय घरफोडीच्या आणि वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यात तब्बल ४७ गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ६ पोलीस ठाण्यांतर्गत असणारे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. आरोपीचे नाव आणि पूर्वइतिहास: […]

Read More

वर्धा शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघड, ७० हजारांच्या गाड्यांसह अमरावतीच्या चोराला अटक

वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डी. बी. पथक) मोटर सायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून ७०,००० रुपये किमतीच्या दोन मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. पहिली घटना आणि गुन्हा नोंद: समतानगर, सावंगी मेघे येथील रहिवासी धर्मपाल महादेवराव पाटील (वय ४० वर्षे) यांनी २५ जून २०२६ रोजी रात्री […]

Read More

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज आणि गांजासह तिघांना अटक, ३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती: – अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ (Zero Tolerance Policy) राबवली जात आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, अमरावती शहर पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी २२.०७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजासह एकूण ३ लाख ६३ हजार […]

Read More

अमरावती शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ३७ गोवंश जनावरे जप्त, २ आरोपी ताब्यात

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखेने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या कारवाईदरम्यान ४,८६,००० रुपये किमतीची ३७ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने या जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.सदरची धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला  पोलीस उपआयुक्त यशवंत […]

Read More

यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: कारसह दोन धारदार तलवारी जप्त, सराईत गुन्हेगार अटकेत

यवतमाळ (घाटंजी): घाटंजी शहरात बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ८ जुलै २०२६ रोजी खापरी नाका जवळील येळाबारा रोडवर करण्यात आली.सदर धडक कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस […]

Read More

वर्ध्यात हॉटेलवर छापा; देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एका आरोपीला अटक तर पीडित महिलेची सुटका

वर्धा: शहरातील भामटीपुरा चौक परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा वर्धा पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांच्या संयुक्त पथकाने ८ जुलै रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, परराज्यातून आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात […]

Read More

कास रस्त्यावरील सांबरवाडी नाकाबंदीत सराईत गुन्हेगार जेरबंद; देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त!

सातारा:- कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!