अमरावती शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ३७ गोवंश जनावरे जप्त, २ आरोपी ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखेने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या कारवाईदरम्यान ४,८६,००० रुपये किमतीची ३७ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने या जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.सदरची धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला  पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके साहेब,पोलीस उपआयुक्त प्रांजली सोनावणे मॅडम, सहायक पोलीस आयुक्तकैलास पुंडकर साहेब, आणि सहायक पोलीस आयुक्त  नयन आलुरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती अमरावती शहर गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार ९ जुलै २०२६ रोजी आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे आणि गुन्हेगार तपासणीसाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, बिस्मिल्ला नगर येथील एका गोठ्यात (कोठ्यामध्ये) कत्तलीसाठी व विक्रीसाठी काही गोवंश जनावरे चारा-पाण्याविना अमानुषपणे एकाच दोरीला बांधून ठेवल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.



जनावरांच्या अंगावर जखमा माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बिस्मिल्ला नगर येथील संबंधित गोठ्यावर छापा टाकला. तेथे लहान-मोठी अशी एकूण ३७ गोवंश जनावरे अत्यंत वाईट परिस्थितीत बांधलेली आढळली. त्यानंतर अमरावती महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी निलेश प्रभुसिंग सोळंके व त्यांच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत जनावरांची पाहणी केली असता, अनेक जनावरांच्या अंगावर जखमा झाल्याचे दिसून आले. जप्त करण्यात आलेली सर्व ३७ जनावरे पुढील देखभाल आणि संरक्षणासाठी दस्तुरनगर येथील गोरक्षण संस्थानमध्ये पाठवण्यात आली आहेत.

आरोपींची नावे या कारवाईदरम्यान गोठ्यात दोन इसम मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ही जनावरे कत्तल व विक्रीसाठी आणल्याचे समोर आले, तर गोठ्याची जागा तिसऱ्या आरोपीच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) अब्दुल अझहर अब्दुल नझीर उर्फ बिजली (वय ३३ वर्षे, रा. बिस्मिल्ला नगर, अमरावती) — ताब्यात २) मोहम्मद मुद्धिर मोहम्मद शफी (रा. लालखडी, अमरावती) — फरार ३) सैयद अझहर सैयद अफजल (वय २९ वर्षे, रा. लालखडी, अमरावती) — ताब्यात



एकूण ५,०३,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी पंचांसमक्ष खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • अंदाजे ४,८६,००० रुपये किमतीची ३७ लहान-मोठी गोवंश जनावरे.



  • १५,००० रुपये किमतीचा एक विवो (Vivo) कंपनीचा मोबाईल.

  • अंगझडतीतून मिळालेली २,८४० रुपयांची रोकड.



कारवाई करणारे पोलीस पथक

या मोहिमेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोउपनि फिरोज खान, संभाजी केन्द्रे, पोहवा मंगेश लोखंडे, पो.हवा. नाझिमोद्दीन सैयद, पो. ना. सचिन भोयर, पोलीस अंमलदार रंजित गावंडे, सागर ठाकरे, निखील गेडाम, सूरज चव्हाण आणि चालक चेतन शर्मा व प्रभात पोकळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!